Amol Mitkari : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चेला जन्म दिला आहे. भिडे यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते आणि त्यांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजेंचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. यावर त्यांनी तक्रार केली की, आपल्या शालेय शिक्षक आणि प्राध्यापक चुकीचा इतिहास शिकवत आहेत.
त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमठत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भिडे यांना चांगलेच सुनावले आहे. मिटकरी म्हणाले, “आता आंब्याचा सिझन आलाय म्हणून भिडे बेताल बोलत आहेत.” त्यांनी हेही म्हटले की, भिडेंनी बहुजन समाजातील तरुणांना हाताशी धरून इतिहासाची तोडफोड सुरू केली आहे.
आमदार मिटकरी यांनाही एक प्रश्न विचारला, “छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कोरटकर, सोलापूर आणि विकृत इतिहास लिहिणारे राम गणेश गडकरी यांच्यावर भिडे का काही बोलले नाहीत?” असंही मिटकरींनी म्हटलं आहे. ते अकोला येथे पत्रकारांशी बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते आणि त्यांचे हिंदवी स्वराज्य सर्व जाती-धर्माच्या लोकांचे होते. शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व जगाने मान्य केले आहे.”
संभाजी भिडे यांनी सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत अजून एक गंभीर विधान केले. त्यांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा विचार राबवला, पण त्यांना यश मिळालं नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच विचाराला पुढे नेले. भिडे यांच्या म्हणण्यानुसार, राजकीय पक्ष आणि संघटना स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात.
ही संपूर्ण चर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांना आणि त्यांच्या कार्याला किती महत्त्व आहे, यावर एक नवा वाद निर्माण करत आहे.