Share

‘माझी आर्थिक परिस्थिती असती तर गुजरात फाइल्स मीच तयार केला असता’ – अमोल मिटकरी

Amol-mitkari.

सध्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत १७५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडले आहेत. एक गट चित्रपटाच्या बाजूने आहे, तर दुसरा गट चित्रपटाच्या विरोधात आहे.(amol mitkari statement about gujrat files)

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आणि निर्माते विनोद कापरी यांनी मी गुजरात फाइल्स चित्रपट बनवण्यास तयार आहे, असं ट्विट करत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुजरात फाइल्स या चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्यासंदर्भात बोलत असताना आमदार अमोल मिटकरी यांनी गुजरात फाइल्सचा उल्लेख केला करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, “या चित्रपटावरून नाशिकच्या घटनेचं उदाहरण घ्या, तिथं भगवं परिधान करून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, म्हणजे तुम्हाला दहशत माजवायची आहे का? काश्मीर फाइल्सपेक्षा गुजरात फाइल्स फार भयंकर आहे”, असे वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

आमदार अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, “मुझफरनगरची दंगल असो, गोध्रा हत्याकांड असो, सोहराबुद्दीन प्रकरण असो, यांच्यावर देखील चित्रपट निघायला हवा, अशी मागणी मी वारंवार करतो. माझी आर्थिक परिस्थिती असती, तर गुजरात फाइल्स हा चित्रपट मीच हातात घेतला असता”, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्यासंदर्भात बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, “पंतप्रधान मोदी या चित्रपटाबद्दल बोलले आहेत. मोहन भागवत यांनी या चित्रपटावर भाष्य केलं आहे. भाजपच्या आमदारांनी तर हा चित्रपट मोफत दाखवायला सुरवात केली आहे. पण तरी देखील लोक हा चित्रपट पाहायला जात नाहीत. हा चित्रपट अतिशय बोरींग आहे”, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

या चित्रपटामुळे मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुजरात फाइल्स चित्रपट बनवायला हवा, असे देखील अमोल मिटकरी म्हणाले आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत’, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप
३० वर्षांपासून ओढत होता सिगरेट, अचानक पिवळे पडले पूर्ण शरीर; डॉक्टर म्हणाले…
‘मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईची भेट घेऊन ये’, योगींच्या बहिणीची भावुक विनंती

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now