Amol Mitkari : राज्यात सध्या ठाकरे आणि शिंदे या दोन गटांपैकी खरी शिवसेना कोणाची याबद्दलचा वाद सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे याची जबाबदारी सोपवली आहे. तसेच शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याचाही अद्याप निर्णय लागलेला नाही.
दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगण्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे आज याबाबद्दलचा निर्णय लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. यातच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच अधिकार होता, आहे आणि राहणार. जरी दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या असतील आणि आज निर्णय दिलेला असेल तरी आम्हाला वाटतं की, उद्धव ठाकरेंकडेच धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह राहील.
तसेच शिवसेनेची आचारसंहिता काय सांगते यालाही महत्व आहे असेही ते म्हणाले. या सरकारने १०० दिवसांत शेतकऱ्यांच्या बाजूने कोणता रेकॉर्डब्रेक निर्णय झाला हे छतीवर हात ठेवून सांगावे, असे ते म्हणाले. अजूनही शेतकऱ्याला कुठलीच मदत मिळाली नसल्याचेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आता जी १०० रुपयांत राशनची घोषणा सरकारने केली आहे, त्यात शेतकरी सुखावलेला नाही. या सरकारचे हे शंभरही दिवस वाया गेलेले आहेत. नवरात्र, दहीहंडी, गरबा या धार्मिकतेतच आमच्या लोकांना गुंतवून ठेवत आहेत. पण इथले रोजगार का गेले? इथल्या शेतकऱ्याला मदत का मिळाली नाही?
त्यामुळे १०० दिवसांच्या त्यांच्या कार्यकाळावर शेतकरी नाराज आहे. ज्या राज्यात शेतकरी किंवा बळीराजा नाखूष असेल किंवा उद्विग्न असेल तो राजा आणि ते राज्य जास्त दिवस टिकत नसतं, असे ते म्हणाले आहेत. तसेच शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवर्तनाची नांदी ठरेल, असेही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray: दसऱ्याच्या पावर शो मध्ये एकनाथ शिंदे पडले उद्धव ठाकरेंवर भारी, वाचा नेमकं काय घडलं?
Ambadas Danve : शिंदे फडणवीस सरकारचा पहीला भ्रष्टाचार आला समोर; ५१३ कोटींच्या दिवाळी फूड किटबाबत गंभीर आरोप
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंनी दसऱ्याला केली खरी सत्तापालट, उद्धव ठाकरेंच्या छातीत बाणासारखा टोचणार ‘हा’ वार
Shivsena : धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? शिंदेगट की ठाकरे गट? उज्वल निकम म्हणाले..