Share

‘बागेश्वरला दिसेल तिथे ठोका’; तुकाराम महाराजांच्या अपमानानंतर भडकलेल्या ‘या’ बड्या नेत्याचे आदेश

bageshwar baba

गेल्या काही महिन्यांपासूनच बागेश्वर महाराज चर्चेचा विषय बनले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या अध्यक्षांनी केलेल्या आव्हानानुसार, आव्हान पूर्ण केल्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बागेश्वर महाराजांकडे दैवी शक्ती असल्याचे बोलले जाते. हा दावा सिद्ध करण्यास अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने त्यांना आव्हान दिले होते.

बऱ्याच दिवसांपासून बागेश्वर महाराज चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज दरबार भरवून त्यांच्या भक्तांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, असे त्यांचे म्हणणे आहे. अशातच त्यांनी आता एक नवीन वादग्रस्त विधान केले आहे.

संत तुकाराम महाराजांबद्दल त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज या वादग्रस्त विधानामुळे अजूनच चर्चेत आले आहे. ‘संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची’ असे वादग्रस्त विधान धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी केले आहे.

हे विधान करताच त्यांच्यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळातून सुद्धा बागेश्वर महाराजांच्या या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त करत, ‘शास्त्री जिथे दिसतील तिथेच ठोका’अशी प्रतिक्रिया केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना अमोल मिटकरी यांनी बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संत तुकारामांच्या काही अभंगांचे पुरावे देत अमोल मिटकरी यांनी शास्त्रींवर निशाणा साधला आहे.

इतकेच नव्हे तर बागेश्वर महाराजांना वारकरी संप्रदाय म्हणजे काय माहित नाही असेही त्यांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळेच त्यांनी हे चुकीचे विधान केले आहे. या वादग्रस्त विधानाचा प्रतिकार म्हणून बागेश्वर महाराज जिथे दिसतील तिथेच त्यांना चोप देण्याचा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
नागपूर पोलिसांकडून बागेश्वर बाबांना क्लीनचीट; म्हणाले, अंधश्रद्धेसारखं काहीच नाही…
बागेश्वर धाम: माईंड रिडींग काय आहे? तुम्ही एखाद्याच्या मनातलं कसं ओळखू शकता? वाचा वैज्ञानीक ट्रिक
जया किशोरीसोबत लग्न करणार बागेश्वर महाराज? धीरेंद्रशास्त्रींनी सांगितले सत्य, म्हणाले – हे अगदी…

ताज्या बातम्या इतर धार्मिक

Join WhatsApp

Join Now