“अहो पाटील, तुम्ही काय अजित पवार खिशात ठेवण्याची भाषा करताय? तुमचे १०५ अजितदादांनी गुंडाळलेत”

भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालूच आहे. यामुळे राजकारणात एकच चर्चा रंगलेली आपण पाहत आहोत. याच पार्शवभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकेचा बाण सोडला होता. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीस हे असे दबंग नेते आहेत कि असले १०० अजित पवार खिशामध्ये घेऊन फिरतात.

ते उद्धव ठाकरेंसारखे नाहीत कि सरकारमध्ये काय चालले आहे आणि नाही हेच ठाऊक नाही. देवेंद्र फडणवीस हे असामान्य नेते आहेत, शिवसेनेने भयंकर त्रास देऊन देखील ते ५ वर्षे मुख्यमंत्री राहिले, हि सोप्पी गोष्ट नव्हती.”

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना खडेबोल सुनावले आहे. ते म्हणाले की, ‘अहो पाटील अख्या भारताला तसेच पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना माहित आहे कि अजित दादा काय आहेत. तुम्ही काय खिशात १०० अजित पवार घेवून फिरण्याची भाषा करताय, तुमचे १०५ आमदार तुमच्या सहित मागच्या खिशात अजित दादांनी त्याच दिवशी गुंडाळले ज्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट उठवली.

राहीला प्रश्न तुमचा तर तुम्ही सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ शोधत एका प्रामाणिक महिलेचा (मेधाताईंचा) राजकीय बळी घेतला आहे. काल कोल्हापुरी चप्पल दाखवल्यावर आज तुम्हाला पळावे लागले. आता तुम्हाला पुण्यातील मिसळपाव खाण्याची इच्छा असेल तर अजित दादांच्या नादाला तुम्ही आणि फडणवीसांनी लागू नये.

तेव्हा पाटील तुम्ही नाद कोणाचा पण करा पण अजित दादांचा करू नका.’ असा पलटवार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केला आहे. यावेळी त्यांनी एका चित्रपटाच्या गाण्याद्वारे त्यांचावर खिल्ली आहे.

 

महत्वाच्या बातम्या
“शिष्य आनंद गिरी माझे मुलीसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणार होता म्हणून मी आत्महत्या करतोय”
उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली म्हणाणाऱ्या आजोबांचे निधन, वयाच्या ९६ व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास
VIDEO; मुस्लिम कृष्णभक्तानं गायलं महाभारताचं टायटल सॉंग, आवाज ऐकाल तर व्हाल मंत्रमुग्ध
‘सुप्रियाताई, किरीट सोमय्यांचे लक्ष सद्या बेनामी संपत्तीवर आहे; ते वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.