‘पंढरपुरात फक्त सुरुवात झालीये; जयंत पाटलांच्या एका शब्दाने अख्खी भाजपा कामाला लागलीये’

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार नाव निश्चित करण्यात आलं आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून समाधान महादेव आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. पुढे पाटील म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही’. असे सूचक वक्तव्य यावेळी बोलताना पाटील यांनी केले आहे.

पाटील यांच्या या विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं. ‘पंढरपूरच्या उमेदवारीबाबत पाटील यांनी केलेला दावा हास्यास्पद आहे. फडणवीस यांनी उमेदवार देणार नाही असा कोणताही शब्द दिल्याचं माहिती नाही. असं असतं तर भाजपनं उमेदवार उभा केला नसता. त्यामुळे पाटील यांचं विधान निराधार आणि तथ्यहीन आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, दरेकर यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘जयंत पाटील साहेबांच्या एका शब्दात अख्खी भाजपा कामाला लागली.नेते कमालीचे अस्वस्थ झालेत, असे म्हणत त्यांनी भाजपला लक्ष केले.

याचबरोबर ‘पंढरपुरात आज फक्त सुरुवात झाली , पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे जनसेवक स्व.भारत नाना भालके यांना खरी आदरांजली विजयाच्या रुपाने मतदार बांधव व्यक्त करूनच देतील.’ असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

टीव्हीवरील संस्कारी सून हिना खानचे ‘बिकिनीशूट’, आपल्या बोल्ड अंदाजात हिना करतेय चाहत्यांना घायाळ

कोरोनाच्या संकटात घरी बसून केला भन्नाट प्रयोग, आता व्यवसाय सुरु करुन कमवतोय लाखो रुपये

‘बारामतीत माझे डिपॉझिट जप्त झाले, तरीही मी आमदार झालो, समाधान आवताडेही होतील’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.