“औरंगजेबाला स्वप्नात जसे शिवाजी महाराज दिसायचे, तसे चंद्रकांत पाटलांना अजित दादा दिसतात”

राज्यात जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. तेव्हापासूनन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात वादविवाद सुरु आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे.

आता या दोघांच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस नेते अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, असा टोला मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ज्याप्रमाणे पाण्यातील मासे पाण्याविना तडफडत असतात, त्याप्रमाणे राज्यातील भाजप नेत्यांची आवस्था आहे. त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नये, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

तसेच महाविकास आघाडीची सत्ता पुढील १५ वर्षे असेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केले आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या दाव्यानंतर आता भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ठाकरे सरकार मध्यरात्री पडेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याला उत्तर देत सरकार जाणार हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना केले होते, की झोपेत केले होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तेव्हा पासून या दोघांच्या शाब्दिक वादाला सुरुवात झाली आहे.

अजित पवारांच्या टिकेवरही चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले होते. अजित पवारांनी भाजपवर टिका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, आम्ही बोलायला लागलो, तर महागात पडले, असे चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

पंडित नेहरूंपासून ते मनमोहनसिंग सरकारपर्यंतच्या पुण्याईवरच आजही देश तरलेला आहे- संजय राऊत
नकली आयकार्ड बनवून अभिनेत्रीने घेतली कोरोना लस; धक्कादायक माहिती आली समोर
जाणून घ्या ‘ऊपर आका नीचे काका’ म्हणीचे रहस्य; काकांच्या नावाने भिक मागायचे भिकारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.