सचिन वाझेला पुढची भाजपची खासदारकी पक्की; अमोल मिटकरींनी केले ‘हे’ प्रश्न उपस्थित

 

 

राज्यात सचिन वाझे प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे, अशात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांनी लेटर बॉम्ब टाकत वाझेंना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप केला होता.

आता सचिन वाझेने देखील एक लेटर बॉम्ब टाकला आहे. एनआयएने कोर्टासमोर वाझेने लिहलेले एक पत्र सादर केले आहे, त्यामध्ये अनिल देशमुख यांच्यासोबतच शिवसेने नेते आणि राज्याचे परिवहण मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणीची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

सचिन वाझे यांच्या आरोपानंतर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यामुळे आता याच प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझे यांना पुढची भाजपची खासदारकी पक्की असे म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे, तसेच काही प्रश्नही उपस्थित केले आहे.

सचिन वाझे बद्दल अनेक शंका दिसतात. *)NIA मुळे… १)प्रत्येक वेळी भाऊ सोबत. २) आरोपी असुन देखील वाझेंचे राहणीमान. ३) आरोपी सारखी वागणूक नाही. ४) स्वतः जागोजागी पेरलेले संशयास्पद पुरावे ५) मुद्दाम CCTV समोर जाणे. ६) अचानक लेटर बॉम्ब ७) परमवीर चे राजकीय नातलग… पुढे भाजपची खासदारकी पक्की!, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

दरम्यान, सचिन वाझे प्रकणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अनिल परब यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.