खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाईन

 

पुणे | राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे होम क्वारंटाईन झाले आहेत. पुण्यातील दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समजल्यावर त्यांच्या संपर्कात आल्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे.

डॉ.अमोल कोल्हे एक जून ते चार जून या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांचा या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांशी संबंध आला होता.

हे वृत्त समजल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली असून ती निगेटिव्ह आली आहे. मात्र पुरेशी खबरदारी म्हणून मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय नेत्यांचा अनेक लोकांशी संपर्क येत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.