Share

समाजाची दिशाभूल करण्यासाठी कला क्षेत्राचा वापर, कोल्हेंची काश्मीर फाइल्सवर टीका

amol kohle

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आतापर्यंत २३८ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले होते.(amol kolhe statement about the kashmir files film)

या चित्रपटाच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात दोन गट पडले आहेत. एक गट चित्रपटाच्या बाजूने आहे, तर दुसरा गट चित्रपटाच्या विरोधात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी या चित्रपटावर भाष्य केलं आहे. या चित्रपटाच्या बाबतीत एक विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी चित्रपटावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “चित्रपटातील कलाकृती विचार मांडण्याचा प्रयत्न करत असते. त्याच चित्रपटातील दुसऱ्या बाजूचा विचार मांडण्याची गरज आहे. पण काही प्रमाणात एक विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जाते की काय अशी शंका उपस्थित होत आहे”, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, “एक नेरटीव्ह सेट केला जातोय. त्याची दुसरी बाजू अशी आहे की, जो नरेटिव्ह सेट केला जातोय. त्याच्यापलीकडे जाऊन एक सर्वसमावेशक विचार येण्यासाठी त्याच माध्यमाचा तितक्याच प्रभावी पद्धतीने वापर करता येतो”, असे काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या बाबतीत मत व्यक्त करताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजामौली यांचा बहुचर्चित ‘आर आर आर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देखील प्रेक्षक ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची कमाई करेल, असा अंदाज चित्रपट व्यावसायिक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
लग्नानंतर सकारात्मक उर्जा घरात घेऊन आली वहिनी, कतरिनाच्या दिराने केले तोंडभरून कौतुक
वाढदिवस विशेष: अजय देवगणकडे आहे ८४ कोटींचे जेट, मुंबईमध्ये आहे आलिशान बंगला, संपत्ती वाचून हादराल
भाग्यश्रीवर बराच काळ नाराज होता तिचा पती, सासरवाडीला घडलं होतं असं काही की.., वाचा किस्सा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now