अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारला धु धु धुतले, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी सभागृहात केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकार कोरोना लढ्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्राने लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र अचानक लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे कोल्हे म्हणाले.

तसेच यावेळी पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाची परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. हा धोका लक्षात घेता केंद्राने महाराष्ट्राकडे अधिक लक्ष द्यायला हवे. पण त्याउलट १ सप्टेंबर पासून केंद्र सरकारने महाराष्ट्राची व्हेंटीलेटर्स, पीपीई किट, टेस्टींग किट, एन ९५ मास्क आदींची मदत पुर्णपणे थांबविली आहे. ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळत असल्याचे कोल्हे म्हणाले.

याचबरोबर देशात कोरोना हातपाय पसरवत होता तेव्हा आपण अमेरिकच्या राष्ट्रध्यक्षाच्या स्वागत समारंभात व्यस्त होता. देशाचे आरोग्य सांभाळण्याची गरज असताना आपण राज्यांतील सरकारे पाडण्याच्या कामात व्यस्त होता,’ असे म्हणत नाव न घेता कोल्हे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, जनतेने टाळ्या वाजवल्या, थाळ्या पिटल्या, शंखध्वनी केला जे जे सांगितलं ते ते सगळं केंद्र सरकारवर विश्वास ठेवून केले. मात्र जनतेला आज ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी दारोदार फिरावे लागतंय. काहींना तर रस्त्यावर तडफडत जीव सोडावा लागला. सरकारवर देशाने जो विश्वास ठेवला, त्याचे हेच फळ आहे का? असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला.

‘कोविड योद्धा म्हणून आपण ज्यांच्यावर फुलांचा वर्षावर केला, त्या कित्येक डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टींग स्टाफला आपले प्राण गमावावे लागले त्यांची देखील नोंद केंद्र सरकारकडे उपलब्ध नाही ही अतिशय खेदाची बाब आहे,’ असे म्हणत कोल्हे यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या
खळबळजनक! त्या पार्टीमध्ये दिशावर झाला सामूहिक बलात्कार; प्रत्यक्षदर्शीचा खुलासा
या झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख आणि २४ तास कडक पहारा; काय खास आहे या झाडामध्ये?सुशांत आणि रियाचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल; समोर आले ‘ते’ कृत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.