छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसणार डॉ. अमोल कोल्हे…

मुंबई | राजा शिवछत्रपती आणि त्यानंतर स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे घराघरात पोहचले. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद देखील मिळाला. आता पुन्हा एका अमोल कोल्हे हे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.

सोनी मराठीवर चालू असलेल्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. विशेष बाब म्हणजे या मालिकेचे निर्मातेही डॉ.अमोल कोल्हे यांची जगदंब क्रिएशन्स ही संस्थाच आहे.

सध्या या मालिकेत लहान शिवराय आहेत. मात्र पुढे हळू हळू मालिकेतला काळ कूस बदलणार आहे आणि मोठे शिवराय म्हणून अमोल कोल्हे हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लवकरच शिवरायांच्या भूमिकेतून अमोल कोल्हे चित्रिकरणाला सुरुवात करतील अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, राजा शिवछत्रपती मालिकेत त्यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची आणि त्यानंतर स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजींची भूमिकेने अमोल कोल्हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले आहेत.याच लोकप्रियतेच्या जोरावर कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीत देखील दणदणीत विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या
योगी आदित्यनाथ ‘ठग’! उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यावरून मनसे आक्रमक..
…तर तृप्ती देसाईच्या तोंडाला काळ फासू; शिवसेनेच्या वाघिणीने दिला इशारा
मंदिरातले पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.