‘अमोल कोल्हे नुसता अभिनय करू नका, इतिहास वाचून समजून घ्या, खलनायक ओळखा’

मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिवाळीनिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवगंध हे पुस्तक बाबासाहेब पुरंदरे यांना भेट म्हणून दिले. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

फेसबुक पोस्ट करत कोल्हे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र कोल्हेंनी बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतल्याने लोकं संतापली आहेत. सोशल मिडीयावर कोल्हे यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.

वाचा कशाप्रकारे केलं जातंय ट्रोल…
‘मा. जिजाउंची ज्यानी बदनामी केली, ज्यानी शिवरायांचे ब्राह्मणीकरण केले. पदोपदी अपमान केला. अशा व्यक्तीची भेट घेउन आपण धन्य झाला असेल तर …. आपल्याकडून तरी आम्हा बहुजनाना अशी अपेक्षा नव्हती.’

‘डॉ. अमोल कोल्हे साहेब आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. नुसता अभिनय करू नका,इतिहास वाचून समजून घ्या.आणि खलनायक ओळखायला शिका.’

‘डॉक्टर साहेब चुकीच्या माणसाची भेट घेतलीत आई जिजाऊंची बदनामी करणारी माणसं तुमच्यासाठी आदरणीय असतील आमच्यासाठी नाहीत… चुकलात तुम्ही डॉक्टर साहेब.’

वाचा काय म्हणाले अमोल कोल्हे?
आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला. शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसंस्कार सृष्टी या प्रकल्पाची माहिती घेऊन या संकल्पनेचे बाबासाहेब पुरंदरे यांनी भरभरुन कौतुक केले.

स्वराज्यजननी जिजामाता मालिका, आगामी चित्रपट यावर मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या प्रसंगी शिवगंध हे पुस्तक त्यांना भेट म्हणून दिले. तर त्यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती हे पुस्तक दिवाळी भेट म्हणून मिळाले. वयाचे शतक साजरे करणाऱ्या एका आदरणीय शिवप्रमेचीच्या सहवासातील हा अविस्मरणीय दिवाळसण, असे अमोल कोल्हे म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या
किरीट सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना मेंटल हाॅस्पीटलमध्ये नेऊन शाॅक द्यावा लागेल
‘भाषा सांभाळून वापर नाहीतर फटके देऊ’; भाजप नेत्याची सेनेच्या बड्या मंत्र्यांला थेट धमकी
‘बेताल आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.