प्रेग्नेंट हेमा मालिनीला अमिताभ बच्चनने दिली होती ‘अशी’ ऑफर की धर्मेंद्रचा राग झाला अनावर

८० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये अमिताभ राज्य मानले जायचे. त्यांचे स्टारडम दिवसेंदिवस वाढत होते. अशा परिस्थितीमध्ये चित्रपटाचे निर्माते अमिताभला चित्रपटामध्ये घेतल्यानंतर पुढील सर्व निर्णय त्यांच्यावर सोडायचे. चित्रपटामध्ये अभिनेत्री कोण असणार किंवा खलनायकाचे काम कोण करणार? हे सर्व निर्णय अमिताभ घ्यायचे.

अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटाचे निर्णय घ्यायचे. पण एका काळानंतर अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत काम करणे बंद केले. त्या काळामध्ये अमिताभ गर्भवती हेमा मालिनीकडे मदत मागायला गेले होते. जाणून घ्या नक्की काय आहे पुर्ण किस्सा.

८० च्या दशकात राज एन सिप्पीने ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाची सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांची पहीली पसंती अमिताभ आणि रेखा होते. अमिताभने चित्रपटाला होकार दिला. पण जया बच्चनच्या दबावामूळे त्यांनी रेखासोबत काम करायला नकार दिला.

अमिताभच्या नकारानंतर चित्रपटासाठी नवीन अभिनेत्री शोधण्याचे काम सुरु झाले. अनेक हिट अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत काम करायला नकार दिला. त्यामूळे शेवटी अमिताभ स्वत: अभिनेत्रीच्या शोधात निघाले. त्यांनी परवीन बाबीला चित्रपटासाठी विचारणा केली. पण त्यावेळी त्या आजारी होत्या त्यामूळे त्यांनी चित्रपटाला नकार दिला.

त्यानंतर झीनत आमानने देखील चित्रपटाला नकार दिला. त्याकाळी अमिताभसोबत मोठी अभिनेत्री हवी होती. त्यामूळे शेवटी अमिताभ चित्रपटाची ऑफर घेऊन हेमा मालिनीकडे गेले. त्यावेळी हेमा मालिनी सात सहा महिन्यांच्या गर्भवती होती.

गर्भवती असल्यामूळे त्यांनी चित्रपटांपासून ब्रेक घेतला होता. ही गोष्ट धर्मेंद्रला समजताच त्यांना अमिताभचा राग आला. त्यांनी अमिताभला घरातून जायला सांगितले. धर्मेंद्रचा राग बघून हेमाजींनी अमिताभला नकार कळवला.

पण अमिताभ मात्र काहीह ऐकायला तयार नव्हते. त्यांनी चित्रपटाच्या स्क्रिप्ट बदल करायला सांगतिले आणि परत एका हेमा मालिनीला चित्रपट ऑफर केला. त्यांनी हेमाला चित्रपटामध्ये काम करण्याची विनंती केली. शेवटी हेमा मालिनीने चित्रपटाला होकार दिला.

सात महिन्याच्या गर्भवती असताना हेमा मालिनीने सत्ते पे सत्ता चित्रपटामध्ये काम केले. त्यामूळे चित्रपटातील अनेक सीन्समध्ये हेमा मालिनीने शॉल घेतली आहे. शॉलमूळे त्यांची प्रेग्नेंसी दिसत नव्हती. चित्रपट हिट झाला होता.

गर्भवती असताना चित्रपटामध्ये काम केल्यामूळे हेमा मालिनीला धर्मेंद्रचा राग सहन करावा लागला होता. तर दुसरीकडे अमिताभ आणि धर्मेंद्रचे बोलणे अनेक दिवस बंद होते. पण काही दिवसांनी मात्र दोघांमधला तणाव कमी झाला.

महत्वाच्या बातम्या –

अभिनेत्री प्रिया राजवंशची गळा दाबून करण्यात आली होती हत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

ऐश्वर्या रायमूळे आजही अविवाहीत आहे अक्षय खन्ना; सगळ्यांसमोर केले होते लग्नासाठी प्रपोज

माधूरी दिक्षित आणि आयशा जुल्कासोबत ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्री बॉलीवूडमध्ये करणार कमबॅक

एका टॉपसेल फोटोशूटमूळे वादाच्या भवऱ्यात अडकली होती ममता कुलकर्णी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.