…म्हणून अनिल अंबानीचे स्थळ घेऊन ऐश्वर्या रायच्या घरी गेले होते अमिताभ बच्चन

फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या रायला ओळखले जाते. तिने तिच्या सौंदर्याच्या जीवावर लाखो तरुणांची मने जिंकली आहेत. आज ती चित्रपटांपासून दुर असली तरी तिचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. आजही करोडो लोकं ऐश्वर्या रायचे दिवाने आहेत.

ऐश्वर्या रायने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयूष्यामूळे देखील अनेकदा चर्चेत असायची. सलमान खान आणि विवेक ऑबेरॉयसोबतचे तिचे अफेअर खुप गाजले होते. पण २००७ मध्ये तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.

लग्नानंतर ती चित्रपटांपासून थोडी दुर गेली. लग्नानंतरही ऐश्वर्याचे लाखो दिवाने आहेत. तिच्या प्रेमात पागल झालेल्या लोकांमध्ये अनेक मोठ्या कलाकारांचे नाव येते. कलाकारच काय तर भारतातील बिजनेस मॅन देखील तिच्या प्रेमात पागल झाले होते.

असेच एक नाव म्हणजे अनिल अंबानी. अनिल अंबानी ऐश्वर्याच्या प्रेमात पागल झाले होते. त्यांना ऐश्वर्यासोबत लग्न करायचे होते. महत्वाचे म्हणजे या सर्व गोष्टींबद्दल अमिताभ बच्चनला माहीती होती. ते स्वत: अनिल अंबानीचे स्थळ घेऊन ऐश्वर्याच्या घरी गेले होते. हे ऐकल्यानंतर अनेकांदा धक्का बसतो. पण ही गोष्ट खरी आहे.

हा किस्सा ९० च्या दशकातील आहे. १९९४ मध्ये ऐश्वर्या राय मिस इंडीयाचा ताज जिंकली होती. त्यावेळी तिच्या सुंदरतेने लाखो लोकं घायाळ झाले होते. या यादीत बिजनेस मॅन अनिल अंबानीचे नाव देखील होते. ऐश्वर्याला पाहताच क्षणी अनिल अंबानी पागल झाले होते.

त्यावेळी अनिल अंबानी विवाहीत होते. अभिनेत्री टिना मुनीमसोबत त्यांचे लग्न झाले होते. पण ते सगळंकाही विसरुन ऐश्वर्यासाठी पागल झाले होते. त्यांना ऐश्वर्यासोबत लग्न करायचे होते. त्यामूळे त्यांनी तसे प्रयत्न सुरु केले.

त्यांनी अमर सिंगला पुढे करत ऐश्वर्यासोबत मैत्री केली. त्यांनी ऐश्वर्याला इंप्रेस करण्यासाठी कोणतीही कमी ठेवली नाही. त्यांनी तिला करोडोंचे दागिने गिफ्ट केले होते. अनिल अंबानीची पर्सनॅलिटीच काही अशी होती की, ऐश्वर्या देखील त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागली.

त्यांना या संधीचा फायदा घ्यायचा होता. म्हणून त्यांनी त्यांचे खास मित्र अमिताभ बच्चन मदत घेतली. त्यांनी अमिताभला ऐश्वर्याच्या घरी पाठवले. अमिताभ देखील त्यांच्या मैत्रीसाठी अनिल अंबानीचे स्थळ घेऊन ऐश्वर्याच्या घरी गेले. अमिताभ आणि अंबानी कुटूंबाला नाही बोलणे शक्य नव्हते. राय कुटूंब लग्नासाठी तयार झाले.

ऐश्वर्या आणि अनिल अंबानीच्या नात्याची चर्चा सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुरु झाली. ज्यावेळी ही गोष्ट टिनापर्यंत पोहोचली. तेव्हा त्या दुखी झाल्या. त्यांना नात्य मान्य नव्हते. म्हणून त्यांनी अनिल अंबानीला घटस्फोट द्यायला नकार दिला. शेवटपर्यंत त्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या.

टिना अंबानीचा हट्ट आणि अंबानी कुटूंबाच्या दबावापुढे अनिल अंबानीला ऐश्वर्यासोबत ब्रेकअप करावे लागले. त्यांनी ऐश्वर्यासोबतचे सगळी नाती तोडली आणि आपल्या कुटूंबाकडे परत गेले. पण त्यांचे ऐश्वर्यावरचे प्रेम कमी झाले नव्हते.

त्यांच्या मनात कुठे तरी ऐश्वर्यासाठी जागा होती. ही गोष्ट त्यांनी अमिताभला सांगितली होती. पण पुढे जाऊन ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. त्यावेळी मात्र अमिताभ आणि अनिल अंबानीचे खराब झाले. त्यांची मैत्री पुरवीसारखी राहिली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

‘तारक मेहता’ मालिकेतील जिवलग मित्र तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयूष्यात आहेत दुश्मन

ज्या मैत्रिणीने वाईट दिवसांमध्ये मदत केली; त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत होते स्मृती इराणीचे अफेअर

असे काय झाले की, जिगरी यार मनोजकुमार आणि प्राणची मैत्री तुटली

अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनूभव; म्हणाली, रूममध्ये नेऊन…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.