17 महिन्यांच्या अयंशच्या आजाराबद्दल समजताच अमिताभ झाले भावुक, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी लगेच दिले पैसे

मुंबई। सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती 13’ हा सध्या चर्चेचा व चाहत्यांचा आवडता शो बनला आहे. बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन पुन्हा एकदा हा शो होस्ट करत आहेत. मोठं मोठ्या सेलिब्रिटीज अनेकदा एका विशेष हेतूने या शोला हजेरी लावतात.

अशातच अभिनेत्री दीपिका आणि चित्रपट निर्माता-कोरियोग्राफर फराह खान या दोघीदेखील या शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. सध्या या दोघींचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दीपिका, फराह आणि शोचे होस्ट अमिताभ बच्चन हे एका मुलाच्या आजाराच्या (स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी) विषयावर भावुक झाले आहेत.

सोनी टीव्हीने आपल्या इन्स्टाग्रामवरून ‘KBC 13’ चा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दीपिका पदुकोण आणि फराह खान या अमिताभ बच्चन समोर हॉटसीटवर बसल्याचे दिसत आहेत. पहिलं दीपिका पदुकोण सांगते की ती तिच्याद्वारे स्थापन केलेल्या मेंटल हेल्थ फाउंडेशनसाठी आली आहे.

यानंतर, फराह खान सांगते की ती येथे एका 17 महिन्यांच्या अयांशसाठी आली आहे. प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो, की अमिताभ बच्चन म्हणतात फराह खान 17 महिन्यांच्या बाळासाठी खेळत आहे, जो एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे.’ पुढे व्हिडिओमध्ये, अयांशची आई तिच्या मुलाबद्दल आणि त्याच्या आजाराबद्दल सांगते.

ती म्हणते की पहिले सहा महिने सर्व काही ठीक होते पण त्यानंतर अयांशचे हात पाय व्यवस्थित काम करत नव्हते. याबाबत डॉक्टरांनी सांगितले आहे की, अयांशला स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी नावाचा आजार आहे.

यानंतर भावुक होऊन फराह खान म्हणते, ‘जेव्हा अयांश 2 वर्षांचा असेल, तेव्हा त्याच्यावर झोल्जेन्स्मा या औषधाने उपचार केले जातील जे जगातील सर्वात महागडे इंजेक्शन आहे. त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे आणि यामुळे त्याचे आयुष्य वाचू शकते. आम्हाला अयांशला वाचवायचे आहे.

फराह खानचे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन भावुक झाले आणि म्हणाले, ‘मला तुमच्याशी आता बोलावे की नाही ते माहित नाही, पण फराह, मलाही या कामात वैयक्तिकरित्या सहकार्य करायचे आहे, मी तुम्हाला रक्कम नंतर सांगेन. मला आता त्यावर चर्चा करायची नाही.

अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकल्यानंतर फराह खान हात जोडून कृतज्ञता व्यक्त करते. त्याचबरोबर अमिताभ बच्चन इतर लोकांनाही पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन करतात.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! मनोहर मामा विरोधात महिला भक्ताकडून बलात्काराचा गुन्हा दाखल 
ब्रेकींग! मुख्यमंत्र्यांचा मुदतीआधीच तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ 
बाप सरपंच असला तरी पोर बोलते हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल.. 
बाप सरपंच असला तरी पोर बोलते हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.