…म्हणून अमिताभ बच्चनने बॉलीवूड सोडून गावाकडे जाण्याचा घेतला होता निर्णय

आज अमिताभ बच्चन इंडस्ट्रीचे महानायक आहेत. पण इथपर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना हे यश मिळवले होते. एक काळ तर असा आला होता ज्यावेळी त्यांनी इंडस्ट्री सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलीवूडमध्ये आल्यानंतर पहीला चित्रपट मिळवण्यासाठी अमिताभ कित्येक दिवस वाट बघत होते. सहजासहजी त्यांना हे यश कधीच मिळाने नाही. कधी निर्मात्यांनी चित्रपटातून काढून टाकले. तर कधी अभिनेत्रींनी एकत्र काम करायला नकार दिला. या कारणांमूळे यशापर्यंतचा प्रवास खुपच कठिण होता.

अमिताभला काम न मिळण्यामागचे अजून एक कारण म्हणजे त्यांची उंची. अमिताभच्या जास्त उंचीमूळे त्यांना काम मिळू शकत नव्हते. अनेक अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करायला नकार द्यायच्या. त्यांना काम मिळवण्यासाठी खुप मेहनत करावी लागली होती.

अनेक दिवस मेहनत केल्यानंतर त्यांना दुनिया का मेला चित्रपटात काम मिळाले. पण निर्मात्यांना ही गोष्ट मान्य नव्हती. म्हणून त्यांनी अमिताभला अचानक चित्रपटातून बाहेर काढले. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवीन असले अमिताभ काही करु शकत नव्हते.

१९७३ मध्ये दिग्दर्शक कुंदन कुमारने सुनील दत्तच्या सांगण्यावरुन अमिताभला त्यांच्या ‘अपना पराया’ चित्रपटात घेतले. चित्रपटात रेखा मुख्य अभिनेत्री होत्या. त्यामूळे अमिताभच्या उंचीचा देखील काहीच प्रॉब्लेम नव्हता. सगळं काही व्यवस्थित सुरु होते.

चित्रपटाच्या गाण्यांची शुटींग झाली होती. त्यासोबत चित्रपट आर्धा शुट करुन झाला होता. कुंदर कुमार चित्रपटाच्या मार्केटिंग टिमला भेटले होते. त्यावेळी त्यांनी चित्रपट रिलीज करण्यास नकार दिला. कारण चित्रपटात अमिताभ मुख्य भुमिकेत होते.

या चित्रपटात दिग्दर्शकाचे लाखो रुपये लागले होते. त्यामूळे त्यांनी अमिताभला चित्रपटातून काढून संजय खानला चित्रपटात घेतले आणि चित्रपट पुर्ण केला. ही गोष्ट अमिताभ बच्चनला बिलकूल आवडली नाही. त्यांची मेहनत वाया गेली होती.

या घटनेनंतर अमिताभने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. ते कोलकात्ताला निघाले होते. या काळात गुलजारने त्यांना समजवले आणि हिंम्मत ठेवायला सांगितले. काही दिवसांनी जया भादूडीच्या सांगण्यावरुन त्यांना झंझीर चित्रपट मिळाला आणि हिट झाला.

सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी त्यांची मदत केली. तर काही कलाकार त्यांना परत जायला सांगायचे. पण अमिताभ मात्र नेहमी त्यांच्या कामावर लक्ष द्यायचे आणि काम करायला प्रयत्न करायचे. याच कारणामूळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये यश मिळाले आणि ते स्टार बनले.

महत्वाच्या बातम्या –
सलमान खान, माधूरी दिक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या साहिला चड्डाची आज झाली आहे वाईट अवस्था
गेल्या २२ वर्षांपासून सनी देओल आणि करिश्मा कपूर लढत आहेत एकच केस
राजकूमार संतोषीपासून विक्रम भट्टपर्यंत ‘हे’ दिग्दर्शक त्यांच्याच अभिनेत्रीच्या प्रेमात झाले होते पागल
…म्हणून झाले प्रियांका चोप्रा व शाहीद कपूरचे ब्रेकअप; अखेर खरे कारण आले समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.