पान मसाल्याची जाहिरात केली म्हणून अमिताभ बच्चनने मागितली क्षमा; म्हणाले, पैसे भेटतात म्हणून करावी लागते

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन अनेक जाहिरातींमध्ये दिसून येत असतात. त्यांची प्रचंड फॅन फॉलोविंग सुद्धा आहे, त्यामुळे त्या जाहिरातींचा प्रभाव कोट्यावधी लोकांवर न कळतपणे पडत असतो.

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी रणवीर सिंगसोबत पान मसालाची जाहिरात केली. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. विमलची जाहिरात केल्यानंतर अजय देवगणला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले किंबहूना अजूनही त्याला ट्रोल केले जात आहे. अशाचप्रकारे अमिताभ बच्चन यांनाही ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट टाकली आणि लिहिले, घड्याळ खरेदी करून मी माझ्या हातात काय बांधले, वेळ माझ्या मागेच लागला. त्याच्या या पोस्टवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर एका वापरकर्त्याने लिहिले, नमस्कार सर, फक्त एक गोष्ट विचारायची आहे, तुम्हाला इतकी काय गरज पडली की तुम्हालाही कमला पसंद पान मसाल्याची जाहिरात करावी लागली. मग तुमच्यात आणि या तत्पुंजीयांमध्ये काय फरक आहे?

आता या प्रश्नाला थेट अमिताभ बच्चन यांनीच उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले, ‘मान्यवर, मी माफी मागतोय, जर कोणी कोणत्याही व्यवसायात चांगले करत असेल, तर आपण त्याच्याशी का संबंध ठेवत आहोत असा विचार करू नये. होय, जर एखादा व्यवसाय असेल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या व्यवसायाचाही विचार करावा लागतो.

आता तुम्हाला असे वाटते की मी हे करू नये, पण असे केल्याने मला पैसेही मिळतात, पण आमच्या उद्योगात काम करणारे बरेच लोक आहेत. जे कर्मचारी आहेत त्यांनाही काम आणि पैसेही मिळतात. मान्यवर तत्पुंजीया हा शब्द तुमच्या बोलण्यात शोभत नाही आणि आमच्या उद्योगातील इतर कलाकारांनाही शोभत नाही. मी तुम्हाला आदराने नमस्कार करतो, असे उत्तर अमिताभ बच्चन यांनी दिले आहे.

विशेष म्हणजे बॉलिवूड स्टार्स मद्य, तंबाखू आणि पान मसाला जाहिरात करताना दिसू शकतात. जेव्हा या जाहिरातींवर आक्रोश होतो तेव्हा हे कलाकार गप्प बसतात. एकदा प्रियांका चोप्रा म्हणाली होती की तिला जे काही जाहिरात करायची आहे ती ती करेल, जर लोकांना उत्पादन खरेदी करायचे नसेल तर खरेदी करू नका.

महत्वाच्या बातम्या-

रात्रीत मालामाल झाला शेतकरी! बॅंक खात्यात अचानक आले ५२ कोटी; जाणून घ्या पुर्ण प्रकरण
TCS मधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून शेती करतेय ही तरुणी, आज वर्षाला कमावतेय तब्बल २० कोटी रुपये!
मनोहरमामाला भविष्य विचारले की, तो प्रेयसीचे नावही कसं काय सांगायचा? ‘असा’ झाला भांडाफोड..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.