अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; शस्त्रक्रियेबद्दल दिली माहिती…

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते नेहमी आपल्या लाखो चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र अमिताभ यांच्या एका ब्लॉगनं आता चाहत्यांना धक्का बसला आहे.

ब्लॉगमधून हे समोर आले आहे, की त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना सर्जरी करावी लागणार आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगमधून लिहिलं आहे की, ‘मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही, एबी’.

अमिताभ यांचा हा ब्लॉग पाहिल्यानंतर चाहतेही चिंतेत पडले आहेत. बिग बींची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांना नक्की काय झालं आहे? त्यांना कोणत्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाहीये.

दरम्यान, बिग बीच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे. चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. लोक सतत कमेंट करुन त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

झी मराठी वाहिनीवरील ‘या’ मोठ्या अभिनेत्रीला अज्ञातांकडून मारहाण

डोळ्याला मास्क लावून झोपलेल्या प्रवाशाचा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले…

अक्षय कुमारच्या प्रेमात पागल झालेल्या शिल्पा शेट्टीने उचलले होते ‘हे’ टोकाचे पाऊल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.