महानायक अमिताभ बच्चन झाले मराठमोळ्या काॅमेडीकिंग समीर चौगुले समोर नतमस्तक

छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा हा फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात प्रसिद्ध झाला आहे. आता या कार्यक्रमातील कलाकारांनी नुकतीच कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपली हजेरी लावली होती.

यावेळी सेटवर विनोदाचा बादशाह समीर चौगुले यांना बघताच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्यासमोर आदराने झुकले आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन चक्क समीर चौगुले यांच्या पाया पडताना दिसत आहे. संपुर्ण मनोरंजन विश्वातला हा सुवर्णक्षण असल्याचे म्हटले जात आहे. हा फोटो बघून अनेकजण हैराण झाले आहे.

सध्या कौन बनेगा करोडपतीचा १३ वा सिजन सुरु आहे. यावेळी विनोदी कलाकारांनी या सेटवर हजेरी लावली आहे. या कलाकारांना भेटताच अमिताभ बच्चन यांनी त्यांचे खुप कौतूक केले आहे. तर समीर चौगुले यांच्या अभिनयाला विशेष दाद देत त्यांच्यासमोर आदराने झुकले आहे.

अभिनेता प्रसाद ओकने सोशल मीडियावर यासंबंधीचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये संपुर्ण टीम अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना दिसून येत आहे. प्रसाद ओकने शेअर केलेले फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रसाद ओकने कॅप्शनमध्ये म्हटले की, काही काही मित्र आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठीच आलेले असतात…तसाच एक जवळचा मित्र म्हणजे “अमित फाळके”. ज्यानी २००९ साली माझं चित्रपट दिग्दर्शनाचं स्वप्न पूर्ण केलं… मला “हाय काय नाय काय” करता आला तो अमित मुळेच. आणि आता आयुष्यातलं अजून एक स्वप्न पूर्ण झालं ते ही त्याच्यामुळेच.

ज्याला मी देव मानत आलोय त्याचं दर्शन झालं… प्रत्यक्ष “बच्चन” साहेबांचं… महाराष्टाची हास्य जत्रा हा कार्यक्रम बच्चन साहेब नियमित पाहतात आणि त्यामुळे आमच्या पूर्ण टीमचं कौतुक करण्यासाठी त्यांनीच ही संधी आम्हाला दिली. हास्यजत्रेच्या टीमचा भाग असल्याचा आज प्रचंड अभिमान वाटतोय. मनःपूर्वक आभार “सोनी मराठी” चे आणि खूप खूप खूप प्रेम “अमित फाळके”…!!!

महत्वाच्या बातम्या-

सलमान खानच्या ‘शेरा’ला तर सगळेच ओळखतात पण या व्हिडीओनंतर फेमस झाला राज कुंद्राचा बॉडीगार्ड
महिला अत्याचारांचे सर्वात जास्त प्रकरण भाजपशासित राज्यांमध्येच; काँग्रेसने आकडेवारी सादर करत भाजपचे केले तोंड बंद
मुंबई पोलीसांनो माझी माफी मागा, नाहीतर..; किरीट सोमय्यांची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.