..म्हणून बाॅलीवूड कलाकार लग्नात फक्त १०१ रूपये आहेर करतात; अमिताभ बच्चनचा खुलासा

भारतामध्ये लग्नाला खुप जास्त महत्त्व दिले जाते. कारण लग्न ही गोष्ट दोन कुटुंबांंना एकत्र आणते. कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव न करता सगळ्यांना जोडून ठेवते. त्यामूळे लग्नाला खुप जास्त महत्व दिले जाते.

आपण लग्नात जाताना काहीना ना काही गिफ्ट घेऊन जात असतो. कारण लग्न हा शुभप्रसंग असतो. शुभप्रसंगाला जाताना रिकाम्या हाताने जायचे नसते. काही तरी गिफ्ट घेऊन जायचे असते.

आपल्याला जर गिफ्ट घेऊन जायचे नसेल तर मग आपण लिफाफा घेऊन जातो. त्या लिफाफ्यात आपण आपल्याला हवे तेवढे पैसे ठेवतो आणि तो लिफाफा नवरी नवरदेवाला देतो. ही गोष्ट झाली सामान्य लोकांची.

पण मोठे लोक आणि बॉलीवूडचे कलाकार लग्नाला जाताना किती रुपयांचा लिफाफा घेऊन जात असतील? हा प्रश्न आपल्या सर्वांना पडत असेल. आज आम्ही तुम्हाला याचं प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.

बॉलीवूड कलाकारांकडे खुप जास्त पैसे असतात. त्याप्रमाणेच त्यांची लाइफस्टाइल देखील तशीच महागडी असते. बॉलीवूड कलाकारांचे लग्न तर सर्वात महाग असते. करोडो रुपये लग्नात खर्च केले जातात. त्यामूळे ते लिफाफ्यात किती रुपये देतात हे खरंच विचार करण्यासारखे आहे?

या गोष्टीचा खुलासा बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये केला आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, बॉलीवूडचे कलाकार लग्नाला जाताना किती रुपयांचा लिफाफा घेऊन जातात?

यावर अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिले की, बॉलीवूडचे सर्व कलाकार लग्नाला जातात. तेव्हा त्या लिफाफ्यात १०१ रुपये ठेवतात. कारण प्रत्येकाकडे जास्त पैसे नसतात. जसे की, स्पॉट बॉय, कॅमेरामॅन त्यामूळे १०१ रुपये ठरवले आहेत.

लग्नात कोणासोबतही भेदभाव नको म्हणून बॉलीवूड कलाकारांनी ही रक्कम ठरवली आहे. कोणत्याही कलाकाराचे लग्न असले तरी तुम्ही १०१ रुपयांचा लिफाफा गिफ्ट करू शकता. जर तुम्हाला लिफाफा द्यायचा नसेल तर मग तुम्ही गिफ्ट घेऊन जाऊ शकता.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ अभिनेत्रीने पतीला घटस्फोट दिल्यानंतर बॉयफ्रेंडच्या बाळाला दिला जन्म

म्यानमारच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव गेले होते स्विमिंग कॉस्च्यूममध्ये

बॉलीवूडच्या ‘या’ स्टार कपलची प्रॉपर्टी ऐकूण तुम्हाला बसेल धक्का

मृत्यूनंतर करोडोंची संपत्ती सोडून गेल्या ‘या’ अभिनेत्री, २ नंबरची होती सर्वात कमी वयाची…

गाडी विकत घेऊ नका कारण टाटा स्वतः १५ लाखांची नेक्सन देताहेत भाड्याने, तेही फक्त..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.