अमिताभ बच्चनने हात जोडून गोविंदाला ‘या’ गोष्टीची विनंती केली होती

९० च्या दशकामध्ये इंडस्ट्रीमध्ये अनेक नवीन चेहरे आले होते. या नवीन चेहऱ्यांमध्ये इंडस्ट्रीतील जुने चेहरे कुठे तरी मागे राहिले होते. त्यामूळे अनेकांचे करिअर खराब झाले होते. तर काही कलाकारांते चित्रपट फ्लॉप होत होते. ते कितीही मोठे सुपरस्टार असले तरी त्यांचे चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत होते.

असेच काही महानायक अमिताभ बच्चनसोबत झाले होते. अमिताभ बॉलीवूडचे महानायक आहेत. आजही त्यांचा नावाचा सिक्का बॉलीवूडमध्ये चालतो. पण एक काळ असा आला होता की, अमिताभ बच्चन देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत होते.

९० च्या दशकामध्ये अमिताभ बच्चनचे चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामूळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी कोणीही तयार नव्हते. तर दुसरीकडे त्यांनी स्वत चे प्रोडक्शन हाऊस सुरु केले होते. पण त्यातही त्यांचे करोडोंचे नुकसान झाले होते. त्यामूळे त्यांना एका यशस्वी चित्रपटाची गरज होती.

त्या कालावधीला बॉलीवूडमध्ये गोविंदाचे स्टारडम खुप जास्त होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट व्हायचा. लोकांमध्ये देखील त्यांचे खुप जास्त क्रेझ होते. त्यांच्यासोबत काम करणे अमिताभ बच्चनसाठी महत्वाचे होते. गोविंदा एकमेव असे व्यक्ति होते जे अमिताभचे स्टारडम वाचवू शकत होते.

म्हणून त्यांनी डेविड धवनला एक चांगली स्क्रिप्ट बनवायला सांगितली होती. त्यांनी ‘छोटे मिया बडे मिया’ चित्रपटाची स्क्रिप्ट बनवली आणि अमिताभला सांगितली. अमिताभने लगेच चित्रपटाची तयारी सुरु करायला सांगितली. पण गोविंदाने मात्र अमिताभसोबत काम करायला नकार दिला होता.

गोविंदा अमिताभचे खुप मोठे फॅन होते. पण त्यांच्यासोबत काम करायला ते घाबरत होते. कारण अमिताभ बच्चन टाईमला खुप महत्व देत होते. प्रत्येक गोष्ट वेळेवरच व्हायला ही असा त्यांचा हट्ट होता. तर दुसरीकडे गोविंदा सेटवर नेहमी उशीरा यायचे. त्यांच्या उशीरा येण्याच्या सवयीमूळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचे नाव खुप खराब होते.


गोविंदाने चित्रपटाला नकार दिला ही गोष्ट समजताच अमिताभ त्यांना भेटायला गेले. त्यांनी गोविंदाला चित्रपटाला नकार देण्याचे कारण विचारले. त्यावेळी गोविंदा म्हणाले की, ‘मी स्टार असेल. पण माझे इंडस्ट्रीमध्ये जेवढे चांगले नाव आहे तेवढेच वाईट देखील आहे. तुम्हाला माझ्यासोबत काम करायचे असेल तर मग इंडस्ट्रीतील अफवांकडे दुलर्क्ष करावे लागले’.

अमिताभने हसत हसत ही अट मान्य केली. त्यांनी हात जोडून गोविंदाला चित्रपटामध्ये काम करण्यासाठी धन्यवाद सांगितले होते. अमिताभ वेळेला महत्व देऊन प्रत्येक गोष्ट वेळेवर करायचे तर दुसरीकडे गोविंदा कधीच वेळेवर यायचे नाही. म्हणून चित्रपटाच्या दिग्दर्शकाला खुप जास्त काळजी घ्यावी लागायची.

बडे मिया छोटे मिया चित्रपट त्या चर्चेचा विषय बनला होता. चित्रपटासाठी गोविंदाने वेळेवर यायला सुरुवात केली तर कधी कधी अमिताभ उशीरा यायचे. अशा प्रकारे चित्रपट पुर्ण झाला. रिलीजनंतर चित्रपट सुपरहिट झाला होता. दोघांच्या करिअरमध्ये हा चित्रपट खुप महत्वाचा ठरला.

महत्त्वाच्या बातम्या –

८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रियाची झाली आहे ‘अशी’ अवस्था; घर चालवण्यासाठी करते ‘हे’ काम

अखेर अक्षय कुमारने सांगितले सत्य; म्हणाला, या कारणामूळे मी मुलगी निताराला मिडीयापासून दुर ठेवतो

अभिनेता संजय कपूरच्या मुलीचे ग्लॅमरस फोटोशूट झाले व्हायरल; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

अभिनेता अंकूश चौधरीची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.