‘ही’ व्यक्ती असेल अमिताभ बच्चनच्या २८०० कोटींच्या संपत्तीचा वारसदार

अमिताभ बच्चन गेले ५० वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. म्हणून त्यांना बॉलीवूडचे महानायक बोलले जाते. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चनचा सहभाग होतो.

अनेकांच्या हृदयावर राज्य करणारे अमिताभ करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ते अनेक जाहिरातींचा भाग आहेत. चित्रपट आणि जाहिरातींमधून त्यांनी करोडो कमवले आहेत. अमिताभ एकूण २८०० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

अनेक वर्षे मेहनत केल्यानंतर त्यांना हे यश मिळाले आहे. बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर त्यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर त्यांनी एका ठिकाणी ५०० रुपये महिनावर काम केले आहे. वेळेनुसार त्यांचा पगार वाढत गेला.

अमिताभ बच्चनने ‘बॉम्ब टू गोवा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्यानंतर त्यांचा ‘झंजिर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यांना रातोरात स्टारडम मिळाले होते. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटे आणि जाहिरातींच्या माध्यमातून ते वर्षाला ५४ करोड रुपये कमवतात. त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या पैशांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना वर्षाला करोडोंचा फायदा होतो.

महानायक अमिताभ बच्चन चार बंगल्याचे मालक आहेत. अमिताभच्या प्रतिक्षा बंगल्याबद्दल सगळ्यांच माहीती आहे. त्यांच्या या घराची किंमत १६० करोड रुपये आहे. प्रतिक्षा बंगल्यासोबतच त्यांच्याकडे जलसा बंगला देखील आहे. त्यांच्या या बंगल्याची किंमत देखील खुप जास्त आहे.

अमिताभ बच्चनच्या झनक बंगल्याची किंमत देखील खुप आहे. त्यांच्या या बंगल्यात अमिताभचे ऑफिस आहे. त्यासोबतच या बंगल्यात त्यांचे जिम देखील आहे. सगळे बच्चन कुटुंब या जिममध्ये व्यायाम करायला जाते.

बंगल्यासोबतच अमिताभ बच्चन अनेक महागड्या गाड्यांचे मालक आहेत. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू, ऑडी, पोर्ष लेक्सस अशा अनेक गाड्या आहेत. त्यांच्या गाड्यांची किंमत खुप जास्त आहे. अमिताभला महागडे घड्याळ देखील खुप आवडतात.

अमिताभ बच्चनने शेअर मार्केटमध्ये खुप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या शेअर्समधून त्यांना वर्षाला खुप जास्त फायदा होतो. अमिताभच्या एवढ्या संपत्तीबद्दल अनेक वेळा वाद देखील झाले आहेत. पण अमिताभने काही दिवसांपूर्वी त्यांच्या संपत्तीबद्दल खुप मोठा खुलासा केला आहे.

अमिताभने त्यांच्या २८०० करोड रुपयांच्या संपत्तीच्या वारसदाराचे नाव जाहीर केले आहे. अमिताभने सोशल मीडियावर या गोष्टीची माहीती दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या या संपत्तीची वाटणी अभिषेक आणि श्वेता बच्चन दोघांमध्येही समान होईल. दोघेही संपत्तीचे समान वारसदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ व्यक्तीवर प्रेम करत होत्या लता दिदी; एका वचनामुळे लग्न होऊ शकले नाही

सुरैयाच्या प्रेमात पागल झाले होते देवानंद; पण ‘या’ गोष्टीमूळे लग्न होऊ शकले नाही

कंगना राणावतची बोलती बंद करणाऱ्या दिलजीत दुसांजची खरी कहाणी वाचा

तुमची लाडकी प्राजक्ता माळी ‘या’ मुलासोबत करणार लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.