अमिताभ बच्चन आणि अभिषेकला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

 

मुंबई | अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती उत्तम असून दोघांना आज किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे नानावटी रुग्णालया बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

अध्यात्मिक गुरु प्रकाश इंडिया टाटा यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमिताभ आणि अभिषेक यांना डिस्चार्ज मिळू शकतो अशी माहिती दिली आहे.अमिताभ बच्चन यांची ऑक्सिजन लेवल आणि ब्लड प्रेशर सामान्य असल्याची माहिती नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर अली इराणी यांनी दिली आहे.

आज संध्याकाळी दोघांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.या चाचणीचा अहवाल काय येतो यावरून दोघांना डिस्चार्ज द्यायचा का नाही हे डॉक्‍टर ठरवणार आहेत.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोना झाल्याची माहिती ११ जुलैला रात्री उशिरा समोर आली होती. यानंतर दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले. पण त्यांच्यावर घरामध्येच उपचार केले जात होते. पण १७ जुलैला दोघींना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.