दिल्ली | बॉलीवूडमधील बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन हे सध्या KBC मध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे भारतातील प्रत्येक घरात हा शो मोठ्या आवडीने पहिला जातो. आजही त्यांचे अनेक चाहते आहेत.
पण सध्या हा शो टीआरपीमुळे आणि काही तक्रारींमध्ये खूप चर्चेत आहे. याच संदर्भात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी KBC मधील अमिताभ बच्चन आणि काही लोकांवर मुज्जफरनगर येथे कोर्टमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अभिनेता अमिताभ बच्चन, टीवी शोचे निर्माता अरुणेश कुमार, राहुल वर्मा, टीवी चॅनलचे अध्यक्ष मनजीत सिंह, सीईओ एनपी सिंह व बेजवाड़ा विल्सन यांच्यासोबत ७ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिकंदरपूरचे निवासी आचार्य चंद्रकिशोर यांनी गुरुवारी ही तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी आरोप केला आहे की, ते आपल्या घरी KBC सिजन १२ चा एपिसोड बघत होते. कार्यक्रमात अमिताभ बच्चन प्रश्न विचारत होते आणि पुढे बेजवाड़ा विल्सन उत्तर देत होते. ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचार करून देत होते. अधून मधून त्यांच्यात हास्यविनोद होत होता.
नंतर ६४ लाख रुपयांचा प्रश्न आला ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला होता की, २५ डिसेंबर १९२७ ला डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या साथीदारांनी कोणत्या धर्मग्रंथाची पाने जाळली होती?
या प्रश्नाचे चार पर्याय होते A. विष्णुपुराण, B. भागवत गीता, C. ऋगवेद आणि D. मनुस्मृती असे पर्याय होते. या प्रश्नावर चंद्रकिशोर यांचे म्हणणे आहे की, हा प्रश्न मुद्दाम विचारण्यात आला आहे जेणेकरून हिंदू लोकांच्या भावनांना तडा जाईल. ३ डिसेंबरला या प्रकरणावर न्यायालय सुनावणी करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राने पुन्हा एक वीर जवान गमावला! २१ वर्षीय यश देशमुख काश्मीरमध्ये शहीद
तुम्ही ‘गुगल पे’द्वारे पैशांचा व्यवहार करताय? बातमी तुमच्यासाठी आहे महत्त्वाची…