बिग ब्रेकींग! उत्तरप्रदेशमधील निवडणूकीत अमिताभ बच्चन यांचा पराभव

उत्तर प्रदेशातील लखनऊच्या जौनपुरमधल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणूकांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण या ठिकाणी उमेदवाराचे नाव मोठे असले, तरी जनता त्याला पराभूत करु शकते, हे जनतेने दाखवून दिले आहे.

या निवडणूकीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासारख्या नावाच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उमेदाराचे नाव पण अमिताभ बच्चन असल्याने सगळीकडे अमिताभ बच्चन निवडणूकीत पराभूत झाले अशीच चर्चा रंगली आहे.

जौनपुरच्या विकासखंड धर्मापुर वार्ड क्रमांक ७१ मधून जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीत ते अमिताभ बच्चन नावाचा उमेदवार उभा राहिला होता. पण निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर असे झाले की अमिताभ बच्चन यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बसपा पक्षाच्या उमेदवार बुजेश यादव यांनी अमिताभ बच्चन यांना या निवडणूकीत हरवले आहे. बुजेश यादवने ११३३ मतांच्या अंतराने बच्चन यांना हरवले आहे. तसेच समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांची पुतणी मैनपुरच्या जिला पंचायतची निवडणूक हारली आहे.

राज्य निर्वाचन आयोगाने सोमवारी जिला पंचायतीच्या निवडणूकीचा निकाल दिला आहे. त्यामध्ये जिल्हा पंचायतीच्या सदस्य पदावर १८१, ग्राम पंचायत सदस्य पदासाठी २,३२,६१२ उमेदवार, ग्रामपंचायतीच्या मुख्यपदावर ३८,३१७ असे सर्व उमेदवार घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये गेल्या महिन्यात निवडणूका झाल्या होत्या. त्याची मतमोजणी रविवारी सुरु झाली होती, तर ती मोजणी सोमवारी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरु होती.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना पॉझिटिव्ह पत्नी आणि मुलीच्या देखभालीसाठी नाही दिली सुट्टी; पोलिसाने दिला नोकरीचा राजीनामा
आता मृत्यू जवळ आला आहे…; बॉलिवूडचा खलनायक कोरोनाचा हाहाकार पाहून घाबरला
अजबंच! दोनचा पाढा म्हणता नाही आला, म्हणून नवरीने भर मंडपातून केली नवरदेवाची हकालपट्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.