ठाकरे सरकार किती दिवस चालणार?; अमित शहांच्या उत्तराने राजकारणात खळबळ

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षातील नेत्यांकडून राज्य सरकारवर वेगवेगळे आरोप केले जात आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे ठाकरे सरकार जास्त काळ टिकणार नाही लवकरच पडेल असे म्हटले होते.

असे असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच अमित शहांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहे.

अमित शहांना ठाकरे सरकार किती दिवस चालेल,असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, शिवसेनेने आमच्यासोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती.

त्यामुळे आता हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल असा आमचा विश्वास आहे, यासाठी आम्हाला काहीही करावे लागणार नाही, असे अमित शहांनी म्हटले आहे. अमित शहांनी टाईम्स नाऊला विशेष मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

ठाकरे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार या विधानाचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे. भाजप ठाकरे सरकार पाडणार असे त्यांनी म्हटले नाही, पण ठाकरे सरकार कोसळणार असा विश्वास व्यक्त केल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या मुलाखतीत अमित शहांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत सुद्धा विचारण्यात आले होते. मात्र या बैठकीवर भाष्य करण्यास अमित शहांनी नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोवीड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवन, रेमडिसीवर वाटपात भेदभाव; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात प्रेग्नंट हिरोईनने केला “वाथी कमिंग” गाण्यावर भन्नाट डान्स
महिमा चौधरीची मुलगी दिसते सेम तिच्यासारखी; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.