Homeताज्या बातम्यापंतप्रधानांच्या सुरक्षेतील ढिसाळपणा सहण करणार नाही, काॅंग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी माफी मागावी

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ढिसाळपणा सहण करणार नाही, काॅंग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी माफी मागावी

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते, जेथे ते फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते आणि त्यानंतर एका सभेला संबोधित करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे दौरा न करताच त्यांना परतावे लागले.

या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच भाजप नेते या मुद्यावरुन काँग्रेस सरकारवर आक्रमक झाले आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी याप्रकरणी माफी मागावी, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

काँग्रेसशासित प्रदेश पंजाबमध्ये घडलेल्या आजच्या घटनेवरुन हा पक्ष कसा विचार करतो आणि कार्यकरतो हे सर्वांच्या लक्षात आले असेल. जनतेने त्यांना वारंवार नाकारल्यामुळे ते वेडेपणाच्या मार्गावर गेले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी आपल्या या कृत्याबद्दल भारतातील जनतेची माफी मागावी, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.

तसेच गृह मंत्रालयाने पंजाबमधील आजच्या सुरक्षा भंगाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. अमित शाह म्हणाले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षा प्रक्रियेत असा निष्काळजीपणा पूर्णपणे अस्वीकार्य आहे. तसेच याची जबाबदारी काँग्रेस सरकारने घेतली पाहिजे.

दरम्यान, या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पत्रकार परिषदेत घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर परतावे लागले याचे मला वाईट वाटते. पण सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. दौरा रद्द करण्याचा निर्णय अंतिम क्षणी झाला, असे चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले आहे.

तसेच खराब हवामानाबाबत आम्ही त्यांना सांगितले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला अचानक वळवल्याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये सुरक्षेत कोणतीही त्रुटी आढळली नाही. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्ही चौकशी करू. पंतप्रधानांना कोणताही धोका नव्हता, असेही चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
कतरिनाने विकीच्या नावाच्या मंगळसूत्राचा फोटो केला शेअर, लोकं म्हणाली हिंदू धर्म मनापासून स्विकारलास
सख्ख्या भावाशी नाव जोडताच रवीना टंडनची उडाली होती झोप; म्हणाली कुटुंबाची राखरांगोळी…
“पाकीस्तानपासून १० मिनीटांच्या अंतरावर PM ला सुरक्षा देता येत नसेल तर तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही”

ताज्या बातम्या