amit shaha decide to defeat shivsena | काही महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. पण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि सरकार पडले. कारण त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले होते. त्यानंतर जुन महिन्यात भाजप-शिंदेंचे सरकार आले.
भाजप-शिंदे गटाचे सरकार हे खुपच अनपेक्षित होते, असे वाटत असले तरी त्यामागे अप्रत्यक्षपणे भाजपचाच हात होता. त्यामागेही किस्सा आहे. तो म्हणजे भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह यांनी मुंबईत एक पोस्टर बघितले होते. तिथूनच त्यांनी महाराष्ट्रात आपले सरकार आणण्याचा विचार सुरु केला होता.
२०१९ मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार होणार होते. पण मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हात मिळवणी केली होती. पण शिंदेंची बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांना धक्का देणारी होती.
भाजप-शिंदे सरकार काही महिन्यांपूर्वी बनलं असलं तरी त्याची सुरुवात २०१९ मध्येच झाली होती. नवी मुंबईत स्वामी नारायण पंथाचा एक कार्यक्रम होता. तिथे गृहमंत्री अमित शाह आले होते. त्यावेळी कार्यक्रमाला जात असताना त्यांनी रस्त्यावर एक मोठं महाविकास आघाडीचं पोस्टर बघितलं होतं.
अमित शाह यांच्यासोबत त्यावेळी आशिष शेलारही होते. त्या पोस्टरवर शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधींचा फोटो होता. ते पाहून अमित शाह म्हणाले की, ये कैसा है अचंबा है की अपने से बडा स्टेट छीन लिया. तिथून पुढे गेल्यानंतर त्यांना आणखी एक पोस्टर दिसले.
त्या पोस्टरवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधींचा फोटो होता. त्यावेळी अमित शाह म्हणाले की, अपने को इसका कुछ करना पडेगा. त्यावेळी शेलार म्हणाले की, हा अमित भाई कुछ तो करना पडेगा. त्यानंतर अमित शाह म्हणाले की, भावनामें प्रतिक्रिया दी जाती है, लेकीन काम करना है तो ठंडे दिमाग से करना होगा. त्यानंतर तब्बल अडीच वर्षानंतर राज्यात भाजपचं सरकार आलं. त्यामुळे भाजपच्या या सरकारमध्ये अमित शाहांनी महत्वाची भूमिका निभावल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘कितने में बिके हो भाई’, अर्शदीपने लागोपाठ 3 नो-बॉल टाकताच संतापले चाहते; केला फिक्सिंगचा आरोप
आदित्य ठाकरेंचे निकवटवर्तील अमेय घोले शिंदे गटात जाणार? स्वत:च सांगितले नाराजीचे कारण
ved : रितेशचा ‘वेड’ ठरतोय सुपरहिट, थिएटरवाल्यांना बंद करावे लागले अवतार २ अन् सर्कसचे शो