अमित शहा नेपाळ व श्रीलंकेतही भाजपचे सरकार आणणार आहेत; भाजप मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

मुंबई | त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय राजकारणावर राजकीय टिप्पणी केलेली आहे. देब म्हणाले की, ‘भाजप केवळ आपल्याच देशात पार्टीचा विस्तार करण्याची योजना करत नाही, तर आपल्या शेजारील राष्ट्रांमध्येदेखील पार्टीचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.’

त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना बिप्लब देब यांनी शाहांचा मनोदय व्यक्त केला. ‘भाजपला भारताच्या सीमा विस्तारुन विचार करायला हवा, असे अमित शाह यांनी त्रिपुरा दौऱ्यात सांगितल्याचे देब यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना सांगितले.

तसेच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा नेपाळ आणि श्रीलंकेतदेखील भाजपचे सरकार आणण्याची योजना आखत आहेत. २०१८ च्या त्रिपुरातील विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दरम्यान झालेल्या एका बैठकीत ही चर्चा झाली होती, असे दबे यांनी येथे बोलताना सांगितले.

दरम्यान, ‘ज्यांच्याकडे इतकी ऊर्जा आहे, असा दृष्टीकोन आहे, ते बोलत आहेत की भाजपला जगभरात विस्तार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. असा विक्रम फक्त कम्युनिस्टांनी नोंदवला आहे.’ असेही बिप्लब देब म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
फोनचा पासवर्ड विसरलात? ‘या’ काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून क्षणात करा अनलॉक
काळजी घ्या! चुकूनही स्कॅन करू नका क्यूआर कोड, अन्यथा रिकामं होईल तुमचं अकाऊंट
मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं; वाचा का नाकारलं गेलं तिकीट?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.