Amit Shah : महाराष्ट्रात या वर्षी अतिवृष्टीमुळे (Rain) शेतकऱ्यांना (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला आहे. राज्य सरकारने या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांचा मदत पॅकेज जाहीर केला असून, मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून (Central Government) देखील मदतीची अपेक्षा होती.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर तातडीने मदत करण्याबाबत चर्चा झाली. अमित शाह यांनी स्वतः भाषणादरम्यानही या मुद्द्यावर भर दिला. त्यांनी म्हटले की, “महाराष्ट्राचे त्रिमूर्ती जे आहेत, यातून एकही बनिया नाही, पण तिघेही बनियापेक्षा पक्के आहेत,” असा उल्लेख करून शेतकऱ्यांना मदत मिळवण्याचा आश्वासन दिले.
अहिल्यानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Dr. Vitthalrao Vikhe Patil) सहकारी साखर कारखान्याच्या लोकार्पण सोहळ्यास अमित शाह यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर लोणी बाजारतळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात संबोधित करताना त्यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त परस्थितीवर भाष्य केले आणि लवकरच मदत पोहचवण्यात येईल, अशी घोषणा केली.
राज्य सरकारने 31 लाख शेतकऱ्यांना 10 हजार रुपये रोख आणि 35 किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला असून, ई-केवायसी प्रक्रियेतही सुलभता राखण्यात आली आहे. अमित शाह यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अहवाल पाठवा, आम्ही लगेच मदत पाठवू.” तसेच एनडीएतील सर्व आमदार-खासदारांनी सीएम रिलिफ फंडामध्ये एक महिन्याचे वेतन देऊन मदत केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशा प्रकारे, महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून तातडीने मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.






