राज्यात सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू; अमित शहांची मुख्यमंत्र्यांना थेट धमकी

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. विशेषत: भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगनाच्या गोसाबा येथे जाहीर सभा घेऊन थेट ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्यातून टीएमसी सरकार हटवायचं आहे. आजही बंग भूमी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. आमचं सरकार येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवलं जाईल,’ असे ते म्हणाले. सरकार आल्यानंतर सुंदरवन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याचबरोबर राज्यात होत असलेली घुसखोरी ममता दीदींना रोखता येत नाही. त्यात त्या अपयशी ठरत आहेत. परंतु आमचे सरकार आल्यावर घुसखोरीला लगाम घातल्या जाईल, असे आश्वासन देखील अमित शहा यांनी दिले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुलिया येथे रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन असल्याचे म्हणत निशाणा साधला. तसेत दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’, असे म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या 

“महाराष्ट्रात सरकार बनत असताना रश्मी शुक्लांनी नेत्यांचे फोन टॅप केले, त्या भाजपच्या एजंट”

सनी देओलमूळे धर्मेंद्रने बोनी कपूरला दिली होती धमकी; वाचा पुर्ण किस्सा

का तुटलं अंकिता आणि सुशांतसिंगचं नातं? अखेर अंकिताने सांगितलं खरं कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.