Amisha Patel : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमिषा पटेल ही तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या वेगवेगळ्या लुक्सने ती चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. तिच्या अशाच एका लुकचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर फिरत आहे. अमिषा पटेलने निळ्या रंगाचा टू पीस परिधान केलेला आहे. तसेच तिच्या डोळ्यांवरील काळा – पांढरा गॉगल तिच्या लूकमध्ये आणखी भर घालत आहे. तिने केस मोकळे सोडलेले आहे.
आमिषा पटेल ही सध्या ४६ वर्षांची आहे. मात्र, तिच्या या लूकमुळे कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. या लूकमध्ये तिने वेगवेगळ्या पोज देत चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिच्या या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि कमेंट्सदेखील आलेल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CiSpmcMjcyI/?igshid=YmMyMTA2M2Y=
अमिषा पटेल नेहमीच सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकचे व्हिडीओ शेअर करत असते. यातच आता तिने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अमिषाने हिंदी चित्रपटांसोबतच काही तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.
अमिषा पटेलने “कहो ना प्यार है” या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती गदर चित्रपटातही दिसली. आगामी काळात अमिषा पटेल “गदर २” या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे काम सुरु असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Uttar Pradesh : मेहुणीसोबत मिळून दाजी बाईकवर बसून करायचा ‘असं’ काम, सीसीटीव्ही पाहून पोलिसही हैराण
डॉक्टरांकडून मृत घोषित, पत्नीने पतीच्या हाताला स्पर्श करताच हृदयाची धडधड सुरू; वाचा नेमकं काय घडलं?
भाजपचा बडा नेता पवारांच्या भेटीसाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वर; वाचा नेमकं बंद दाराआडं काय घडलं?
CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणाले, आत्तापर्यंतच्या प्रघातानुसार..






