Share

अमीषा पटेलने ‘या’ सेलिब्रीटींना ओढलं होतं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात, एकजण तर होता विवाहीत

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल 9 जून रोजी तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही वर्षांपासून अमिषा पटेल चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय दिसत नाही. अमिषा पटेलने हृतिक रोशनच्या कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.(Amisha Patel, Celebrity, Bollywood, Actress, Faizal Patel, Kanav Puri, Vikram Bhatt, Randhir Kapoor)

यानंतर अमिषा नेहमीच प्रोफेशनल ते पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना डेट केले आहे. एवढेच नाही तर अमिषा पटेलचे नाव एका विवाहित पुरुषासोबत जोडले गेले होते.

अमिषा पटेल तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने फैजल पटेललाही डेट केले. दोघांचे एक ट्विट इंटरनेटवर खूप व्हायरल झाले, ज्यामध्ये फैसलने अमिषाला सार्वजनिकरित्या प्रपोज देखील केले. फैसल पटेल हे HMP फाउंडेशनचे CEO आणि दिवंगत राजकारणी अहमद पटेल यांचे पुत्र आहेत.

अमिषा पटेलचे नाव लंडनस्थित बिझनेसमन कनव पुरीसोबतही जोडले गेले आहे. दोघे बराच काळ एकत्र होते. जून २००८ मध्ये, अमिषाने एका मीडिया पोर्टलला पुष्टी केली की ती कनवला डेट करत आहे. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. २०१० मध्ये, अमिषाने पुष्टी केली की ती आणि कनव पुरी वेगळे झाले आहेत.

तिच्या करिअरच्या सुरुवातीला अमिषा पटेलचे नाव प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत जोडले गेले. दोघांनी जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केले होते. विक्रम भट्ट विवाहित असल्याने अमिषाच्या कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते. या नात्यामुळे अमिषाला तिच्या घरच्यांनीही हाकलून दिले होते.

अमिषा पटेल बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला डेट करत असल्याचंही रिपोर्ट्समध्ये समोर आलं होतं. रणधीर कपूर यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त ही अफवा पसरली होती. जेव्हा अमीषा कपूर कुटुंबाच्या प्रायव्हेट पार्टीत दिसली होती.

अमिषा पटेल निर्माता आणि बिझनेस पार्टनर कुणाल घूमरसोबतही रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, या दोघांचे फार पूर्वी ब्रेकअप झाले.

अमिषा पटेलचे नाव बिझनेसमन नेस वाडियासोबतही जोडले गेले होते. दोघांनी काही दिवस एकमेकांना डेट केल्याचे सांगितले जाते पण नेस वाडियाला अमिषाशी लग्न करायचे होते, तर अमिषाला चित्रपटात करिअर करायचे होते. त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

महत्वाच्या बातम्या
इन्स्टावर २० कोटी फॉलोवर्स असलेला विराट एकटाच क्रिकेटपटू, एका पोस्टसाठी घेतो ‘तब्बल’ एवढे कोटी
आश्रम 3 मधील बोल्ड सोनियाकडे आहेत अनेक आलिशान घरे, संपत्तीचा आकडा वाचून अवाक व्हाल
आश्रम 4 चा बाबा निराला बनण्यासाठी बॉबी देओलने ठेवली ‘ही’ मोठी अट, वाचून हैराण व्हाल
साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री नयनतारा विग्नेशसोबत अडकली लग्नबंधनात, पहा लग्नाचे सुंदर फोटो

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now