विक्रम भट्टच्या प्रेमात पागल झालेल्या अमिषा पटेलने चप्पलने खाल्ला होता आईचा मार

फिल्म इंडस्ट्री जेवढी चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तेवढीच ती वाईट गोष्टींसाठी देखील प्रसिद्ध आहे. अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी इथे होत असतात. असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाईट सवयी किंवा वाईट गोष्टींमूळे प्रसिद्ध आहेत.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. अमिषा पटेल तिच्या फिल्मी करिअर पेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळेच जास्त चर्चेत असते. पहिल्या चित्रपटापासूनच अमिषा सुपरस्टार झाली होती. तिला मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी आली होती.

अमिषा पटेलने २००० ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे अमिषा रातोरात स्टार झाली होती. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. अमिषाला बॉलीवूडची यशस्वी अभिनेत्री समजली जाऊ लागले होते.

पण अमिषाचे हे यश जास्त काळ टिकू शकले नाही. कारण अमिषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे प्रसिद्धीझोतात आली होती. ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ चित्रपटाच्या सेटवर अमिषा आणि विक्रम भट्टची भेट झाली होती.

चित्रपटाच्या सेटवरच दोघांचे अफेअर सुरू झाले होते. दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. पण दोघांनी याकडे लक्ष दिले नाही. दोघांनी लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली. या गोष्टीचा परिणाम अमिषाच्या करिअरवर होत होता.

या सर्व गोष्टींमूळे अमिषाचे आई वडील चिडले होते. ही गोष्ट मीडियामध्ये देखील खुप गाजत होती. त्यांनी अमिषाला विक्रम भट्टपासून लांब राहायला सांगितले होते. पण तिने काहीही ऐकले नाही. या गोष्टीवरून अमिषाचे आई वडीलांशी भांडण झाले.

एका मुलाखतीमध्ये अमिषाने सांगितले होते की, ‘विक्रम भट्टसोबत माझे खुप चांगले होते. पण ही गोष्ट माझ्या घरच्यांना मान्य नव्हती. म्हणून माझ्या आईने मला चप्पलने मारले होते. या गोष्टीमूळे मी माझ्या घरच्यांशी भांडण केले होते’.

अमिषा आणि विक्रम भट्टच्या नात्यामुळे तिचे करिअर खुप खराब झाले. एवढेच नाही तर अमिषाने तिच्या वडिलांवर तिच्या पैशांचा चुकीचा वापर केला म्हणून केस दाखल केली होती. अनेक वर्षे अमिषा आणि तिच्या घरच्यांमध्ये कोर्टात केस सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या –

संजय दत्तच्या पहील्या पत्नीने मृत्यूपूर्वी लिहीलेले ‘हे’ पत्र वाचून सर्वांना बसला धक्का; मुलगी त्रिशला झाली भावूक

बॉलीवूडमध्ये स्टार किड्सला लाँच करण्यासाठी करण जोहर घेतो ‘एवढे’ पैसे

‘मकडी’ चित्रपटातील ‘ही’ बालकलाकार अडकली होती सेक्स रॅकेटमध्ये; जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हणाली…

तब्बूच्या साड्यांना इस्त्री करत होता बॉलीवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; आज एका चित्रपटासाठी घेतो करोडो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.