मेडिकल माफियांनी अमीर खानच्या विरोधात मोर्चा काढावा; बाबा रामदेव यांनी दिले आव्हान

पतंजली उद्योग समूहाचे प्रमुख बाबा रामदेव दरवेळी वेग वेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आता ते एका वेगळ्याच गोष्टीनी चर्चेत आले आहेत. एलोपेथी डॉक्टरांच्या मुद्यावरून ते चर्चेत आले आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्यावर दावा ठोकला आहे. बाबा रामदेव यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे. त्यात त्यांनी १५ दिवसात जर माफी मागितली नाही तर एक हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

रामदेव बाबा यांना यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. रामदेव बाबा यांच्यावर पण टीका करण्यात आली आहे. बाबा रामदेव यांनी या वादात अमीर खानला ओढले आहे. त्यामुळे आता एकाच खळबळ उडाली आहे.

रामदेव बाबांनी त्यांच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी अमीर खानवर आरोप केले आहेत. मेडिकल माफियांमध्ये जर हिंमत असेल तर अमीर खानविरुद्ध खटला दाखल करा असे आव्हानच त्यांनी दिले आहे.

या व्हिडिओमध्ये अमीर खान चर्चा करताना दिसत आहे. त्याने यात डॉक्टरांसोबत चर्चा केल्याचे दिसून आले आहे. त्यात तो डॉक्टरांशी बोलत आहे की, वास्तविक किंमतीपेक्षा जास्त पटीने औषधे विकत असल्याचा आरोप त्याने केला आहे.

या व्हिडीओवरून रामदेव बाबा यांनी मेडिकल असोसिएशनला आव्हान दिले आहे. दरम्यान यावर मेडिकल असोसिएशनने पण म्हटले आहे की, आमचे बाबा रामदेव यांच्याशी शत्रुत्व नाही. त्यांनी त्यांचे विधान मागे घेतले तर आम्ही पण खटला मागे घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या
सिंहाच्या आणि बिबट्याच्या लढाईत बिबट्याला वाचवायला आला हत्ती, पहा मग पुढे काय झालं..

अभिनेत्री शिल्पा शिंदेनी बदलली फिल्ड; आता करतेय कंस्ट्रक्शन साईटवर काम, पहा व्हिडिओ

अभिनेत्रीसोबत डायरेक्टरला करायचा होता किसिंग सीन; स्वत:च सांगितला बॉलिवूडचा धक्कादायक अनुभव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.