अमेरिकेचा हावरटपणा! खरेदी केला कोरोना औषधाचा पुर्ण स्टॉक; बाकीच्यांना नाही मिळणार औषध

 

न्यूयॉर्क | कोरोनाने फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगात थैमान घातले आहे. तसेच जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

अशात काही औषधे कोरोना विषाणू विरोधात प्रभावी ठरणारी आहे. यातले रेमडेसीविर हे एक आहे.

आता अमेरिकेने या औषधांचा संपूर्ण स्टॉक खरेदी केला आहे. ज्यामुळे इतर देशांना पुढील तीन महिने हे औषध मिळणारच नाही.

अमेरिकेने या औषधाचा ग्लोबल स्टॉक खरेदी केला आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसमार्फत ५ लाखांपेक्षा जास्त औषधांचे डोस खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

रेमडेसीविर हे अमेरिकेतल्या गिलियड सायन्सेस (Gilead Sciences) या कंपनीचे औषध आहे. रेमडेसीविर हे एक अँटीव्हायरल औषध आहे.

यूएस नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटमार्फत करण्यात आलेल्या संशोधनात या औषधाचा परिणाम सकारात्मक दिसून आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.