Share

चीनने आक्रमक केल्यास रशिया मदत करेल याची अपेक्षा ठेऊ नका कारण.., अमेरिकेचा भारताला सूचक इशारा

jo-biden

सध्या युक्रेन आणि रशिया या देशांमध्ये भयंकर युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे जागतिक राजकारणात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारताने अमेरिकेच्या(America) धमकीला न जुमानता रशियाकडून कमी किंमतीत कच्चे तेल खरेदी केले होते. या व्यवहारावर अमेरिकेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.(america warn india about russia china )

पण आता अमेरिकेने रशिया आणि चीनचा उल्लेख करत भारताच्या बाबतीत एक मोठं विधान केलं आहे. “चीनने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्यास रशिया तुमच्या बाजूने उभी राहील अशी अपेक्षा अजिबात ठेऊ नका. कारण आता रशिया आणि चीन यांच्यात घट्ट मैत्री झाली असून ते आता मित्रराष्ट्र झाले आहेत”, असा इशारा अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार दिलीप सिंह यांनी दिला आहे.

“भारत आणि रशिया यांच्या व्यापाराबद्दलची माहिती जाणून घेण्यात अमेरिकेला कोणताही रस नाही. तसेच युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियावर जगातील अनेक देशांकडून आणि जागतिक संस्थांच्या माध्यमातून निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधांचे कोणत्याही देशाने उल्लंघन करू नये”, असे स्पष्ट वक्तव्य अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार दिलीप सिंह यांनी केलं आहे.

अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार दिलीप सिंह पुढे म्हणाले की, “भारताने रशियाकडून कच्चे तेल किंवा इतर गोष्टींचा व्यवहार करताना काळजी घ्यावी. कारण रशियासोबत व्यवहार केल्यास ते जागतिक निर्बंधांचं उल्लंघन ठरू शकतं. त्यामुळे भारताने रशियासोबत कोणताही व्यवहार विचारपूर्वक करावा.” अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार दिलीप सिंह सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

या दौऱ्यात दिलीप सिंह यांनी अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून रशिया-युक्रेन युद्धाच्या विषयावर भारतीय प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यावेळी अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार दिलीप सिंह यांनी भारतीय प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिलीप सिंह यांनी भारत-रशिया व्यापार धोरणांच्या बाबतीत अमेरिकेची भूमिका मांडली.

महत्वाची बाब म्हणजे, अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार दिलीप सिंह हे भारतीय वंशाचे आहेत. दिलीप सिंह यांना अमेरिकेन सरकारमध्ये महत्वाचे व्यक्ती मानले जाते. अमेरिकेने रशियावर घातलेल्या निर्बंधांमध्ये उप राष्ट्रीय सल्लागार दिलीप सिंह यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला यांनी अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार दिलीप सिंह यांची भेट घेतली होती.

महत्वाच्या बातम्या :-
कॉंग्रेसचं नाराजीनाट्य थांबेना! आणखी एका आमदाराने व्यक्त केली नाराजी, उचलणार ‘हे’ मोठे पाऊल..
बैलांच्या झुंजीत ‘बाबू’ नावाचा बैल रक्तबंबाळ झाला, तरी कोणी थांबवली नाही स्पर्धा; अखेर बैलाचा मृत्यु
गृह मंत्रालयाच्या कारभारावर शिवसेना नाराज? राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक; अदलाबदल होणार?

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now