आश्चर्यच! देश-परदेशातून या बटाट्यामध्ये राहायला येतात लोकं; एका दिवस राहण्याचे भाडे ऐकून बसेल धक्का

दुकानदार असो वा हॉटेल व्यवसायिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते अनेकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी काही हॉटेल व्यवसायिक आपले हॉटेल वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन सुद्धा करताना दिसून येतात.

अमेरिकेचे हॉटेलही अशाच प्रकारचे आहे, ज्याला बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. हॉटेलचा आकार बटाट्यासारखा आहे. त्या परसरीत येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या हॉटेल मालकाने अशी शक्कल लढवली आहे.

अमेरिकेतल्या या हॉटेलचे नाव आयडाहो पोटॅटो असे आहे. हे हॉटेल साऊथ बोईस आयडाहो या जागेत ४०० एकर मैदानाच्या मध्यभागी आहे. हे हॉटेल बाहेरुन दिसायला पुर्णपणे बटाट्यासारखा आहे. पण आतून हे एक हॉटेल आहे.

तुम्ही जर हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला नक्की धक्का बसेल कारण हे बाहेरुन जितके विचित्र वाटते तितकेच ते आतून सुंदर आहे. या हॉटेलमध्ये ग्राहकांना राहण्यासाठी सर्व व्यवस्था आहे. या हॉटेलमध्ये बेडपासून टॉयलेटपर्यंत सर्व गोष्टी लक्झरी आहे.

अमेरिकेतील आयडोह हे क्षेत्र बटाट्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. बाकीच्या ठिकाणांपेक्षा या ठिकाणी बटाट्यांचे उत्पादन चांगले होते. त्यामुळे या हॉटेल मालकाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बटाट्याच्या आकृतीचे हॉटेल तयार केले आहे.

हे हॉटेल बटाट्यासारखे दिसायला असले, तरी हे हॉटेल राहण्यासाठी स्वस्त नाहीये. या हॉटेलमध्ये राहण्याचे एक दिवसाचे भाडे २०० डॉलर इतके आहे. म्हणजेच जर या हॉटेलमध्ये तुम्हाला एक रात्र थांबायचे असेल तर १५ हजार रुपये खर्च करावे लागतील. तुम्ही या ठिकाणी तुमच्या कुटुंबाला घेऊन येऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी २८ हजार रुपयांनी स्वस्त
लग्न सोहळा सुरू होता, सहाव्या फेऱ्यानंतर नवरी अचानक थांबली, आणि…
‘ही’ असू शकतात लहान मुलांमध्ये कोरोनाची सुरुवातीची लक्षणे, तज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.