अमेरिकेच्या नौसेनेच्या जहाजांमागे लागले होते युएफओ? समोर आला एक विचित्र व्हिडिओ

जगभरात असे म्हटले जाते की पृथ्वीच्या बाहेर एलियन्स असतात. तसेच अनेक लोकांनी असाही दावा केला आहे, की पृथ्वीवर युएफओ म्हणजेच एलियनचे शिप पाहण्यात आले आहे.

आता अशीच एक बातमी समोर आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये असे वाटत आहे, जसे नौसेनाच्या जहाजांचा कोणीतरी पाठलाग करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हे युएफओ असल्याचे म्हटले आहे. ही घटना अमेरिकेच्या नौसेनेसोबत घडली आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ २०१९ चा आहे. जूलै २०१९ मध्ये नौसेनेच्या जवानांनी युएफओला रडारच्या स्क्रिनवर पाहिले होते. तसेच या व्हिडिओमध्ये विचित्र आवाजही ऐकायला येत आहे.

या व्हिडिओमध्ये सैनिक रडारच्या स्क्रिनला पाहताना दिसत आहे. त्यामध्ये ते पाहत्या की शिपजवळ ९ वेगवेगळ्या उडणाऱ्या गोष्टी दिसत आहे. त्यानंतर या सर्व गोष्टी कॅलिफॉर्नियाच्या सेन डिएगोपासून अचानक गायब होऊन जातात.

या व्हिडिओला डॉक्युमेंटरी फिल्ममेकर जेरेमी कोर्बेल यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी पहिले पण अशा काही क्लिप शेअर केल्या होत्या. मात्र सोशल मीडियावर हि व्हिडिओ खुपच व्हायरल झाली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या कार्यकाळात युएफओबद्दल मी विचारपुस केली होती. पण आकशात उडणाऱ्या या गोष्टी नक्की काय आहे, हे सांगणे कठिण आहे.

महत्वाच्या बातम्या-

DDLJ मधील छुटकी इतकी बदलली, फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम, आता करते ‘हे’ काम
..त्यामुळे भर स्टेशनवर बायकोने दांडक्याने नवऱ्याला चोपले, वाचा नेमके काय घडले
लोकांच्या समस्या सोडवणारा सोनू सूदचा दुधवालाच आहे सध्या टेन्शनमध्ये; पहा काय म्हणतोय…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.