VIDEO: कोरोना नियम धाब्यावर; पीपीई कीट घालून रुग्णवाहिका चालकानेच केला वरातीत डान्स

कोरोनाचा फैलाव फक्त राज्यातच नाही तर पुर्ण देशभरात झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती खुप चिंताजनक झाली आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्बंध लावलेले आहे.

कोरोनामुळे इतकी भयंकर परिस्थिती असतानाही अनेक लोक कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. या घटनांचे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

आता सध्या एका रुग्णवाहिकेच्या चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा रुणावाहिका चालक चक्क पीपीई किट घालून वरातीत डान्स करताना दिसत आहे.

संबंधित घटना उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी याठिकाणी घडली आहे. एका रुग्णालयासमोरुन वरात जात असताना, रुग्णवाहिकेच्या चालकाने पीपीई कीट परिधान करुन वरातीत डान्स केला आहे. हा डान्स पाहून सर्वच वऱ्हाडी अवाक् झाले आहे. अनेकांना तर काय करावे हेही सुचत नव्हते.

हल्द्वानीतील सुशीला तिवारी रुग्णालयासमोरुन एक वरात जात होती. त्यावेळी संबंधित रुग्णालयाचा रुग्णवाहिका चालकाने कुठलाही विचार न करता थेट वरातीत घुसून डान्सला सुरुवात केली आहे.

पीपीई कीट घालून डान्स करत असल्याने त्या वरातीत खुप गोंधळ उडाला होता. आरोग्य कर्मचाऱ्याने असे पीपीई कीट घालून डान्स केल्याने अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान,कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात दिवसाला तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहे, तर हजारो रुग्णांचे मृत्यु होत आहे. त्यामुळे कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी सरकार काही निर्बंध लावत आहे.

महत्वाच्या बातम्या-

धर्मेंद्रने अमिताभ बच्चनबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाले शोलेच्या शुटींग वेळी तर
देवमाणूस टाटांचा मदतीचा सपाट सुरूच; हवाईमार्गे परदेशातून ऑक्सिजन टॅंक भारतात दाखल
माझ्यापुढे तुझी औकात काय म्हणत नर्सने पोलीसांसमोर डाॅक्टरच्या कानाखाली वाजवल्या; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.