रुग्णवाहिकेचे बिल तब्बल १ लाख २० हजार घेणाऱ्या डॉक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

देश कोरोनाच्या संकटात असताना अनेक लोक त्याचा गैरफायदा घेताना पण दिसून येत आहेत. काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवताना दिसून येत आहे.

रुग्णाचे नातेवाईक औषधे आणि ऑक्सिजन बेड मिळावे म्हणून चढ्या भावाने पण घेताना दिसून येत आहेत. आता असाच एका धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे.

गुरगावपासून लुधियानापर्यंत रुग्ण आणण्यासाठी रुग्णवाहिकेने थोडेथोडके नव्हे तर तब्बल १. २० लाख रुपये घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णवाहिकेचा चालकाला ताब्यात घेतले आहे.

आरोपीने सुरुवातीला रुग्णाला आणायचे १. ४० लाख रुपये द्या असा तगादा लावला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अनेक विनवण्या केल्या आणि मग त्याने २० हजार रुपये कमी केले.

याप्रकरणी पोलिसानी मिमोह कुमार बुंदवाल याला अटक केली आहे. हा पेशाने डॉक्टर असून तो दोन वर्षांपासून रुग्णवाहिका चालविण्याचे काम करत आहे.

गेल्या वर्षांपासून हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचे काम करत होता. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्यावर त्याने सर्व रुग्णांचे पैसे परत केले आहेत. पोलिसांनी रुग्णवाहिका सेवा कंपनीची माहिती घेतली असून ते पुढील तपास करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.