अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंट हीचा नुकताच ‘अरंगेत्रम सेरेमनी’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला बॉलीवूड अभिनेता सलमान खान(Salmaan Khan) आणि रणवीर सिंग उपस्थित होते. (Ambani’s granddaughter dance in ‘Arangetram’ program)
अंबानी कुटुंबाची सून आणि अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट ही एक उच्च दर्जाची भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. भरतनाट्यम या नृत्य प्रकारातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राधिका मर्चंट हीने ‘अरंगेत्रम’ सादर केला आहे. ‘अरंगेत्रम’ मध्ये नर्तक किंवा नर्तिका पहिल्यांदा सोलो स्टेज परफॉर्मन्स देते. यावेळी राधिका मर्चंटला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंबीय हजर होते.
मुंबईतील बीकेसी भागातील जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी उद्योग, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती हा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. राधिका मर्चंटचे नृत्य पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले.
यावेळी बहुतेकजण पारंपरिक पोशाखात दिसत होते. यावेळी महिलांनी भरतकाम केलेल्या सिल्क साड्या परिधान केल्या होत्या. तर पुरुषांनी शेरवानी आणि कुर्ता असा पोशाख परिधान केला होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे अंबानी आणि मर्चंट कुटुंबीयांनी मनापासून स्वागत केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्रोटोकॉल पाळण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांची सुरवातीला कोविड चाचणी करण्यात आली आणि त्यानंतरच प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळी जाण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी सुरक्षा व्यवस्था काटेकोर ठेवण्यात आली होती. राधिका मर्चंट यांनी ८ वर्षांहून अधिक काळ गुरू सुश्री भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे.
त्यामुळे गुरू सुश्री भावना ठाकर आणि राधिका मर्चंट यांच्या साठी हा महत्वाचा क्षण होता. यावेळी राधिका मर्चंट यांनी आपल्या नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी देखील भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. राधिका मर्चंट ही नीता अंबानी यांच्यानंतर अंबानी कुटुंबातील दुसरी भरतनाट्यम नृत्यांगना असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
उडत्या विमानात दोन भावांनी एकमेकांवर केली लघवी, त्रासलेल्या पायलटनं उचललं धक्कादायक पाऊल
खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोय? संतापलेला गंभीर म्हणाला, ५००० लोकांना खायला…
त्यावेळी मला लुजमोशन अन् उलट्या व्हायच्या कारण.., प्राजक्ता माळीच्या वक्तव्याने चाहतेही हैराण






