Share

Ambadas Danve: अंबादास दानवेचा थेट सवाल; तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते??

Ambadas Danve: पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसर पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण, शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena Thackeray Group) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गंभीर आरोपांचा भडिमार केला आहे. त्यांनी थेट १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार केवळ ३०० कोटींमध्ये पार पडल्याचा आरोप करत “शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं म्हणणारे दादा, स्वतःला मात्र जमीन फुकटात का लागते?” असा बोचरा सवाल उपस्थित केला आहे.

पुण्यातील जमीन खरेदीचा वाद

पुण्यातील महार वतनाची जमीन (Mahar Watana Land) ही पार्थ पवार यांच्या अमेडिया (Amedia) नावाच्या कंपनीने खरेदी केल्याचं दानवे यांनी सांगितलं. त्यांच्या मते, या जमिनीचं बाजारमूल्य तब्बल १८०० कोटी रुपये असताना, ती केवळ ३०० कोटींना घेण्यात आली. एवढंच नव्हे, तर या व्यवहारासाठी फक्त ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचं दानवे यांनी उघड केलं. “ही जमीन सामान्य शेतकऱ्यांची असती तर सरकारने शंभर अडचणी दाखवल्या असत्या, पण पवार घराण्याची असल्याने सर्व फाईल्स दोन दिवसात पुढे गेल्या,” असा आरोप त्यांनी केला.

‘शेतकऱ्यांना फुकट लागतो म्हणणारे दादा, स्वतःचं काय?’

अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्या अलीकडील वक्तव्यांचा उल्लेख करत टोला लगावला. “दादा शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं. पण मग १८०० कोटींची जमीन तुम्हाला ३०० कोटींत कशी काय मिळते? महार वतनाच्या जमिनीचा हा प्रकार म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचं खोटं चित्र आहे,” असं ते म्हणाले.

‘देवभाऊ की मेवाभाऊ?’ असा अप्रत्यक्ष टोला

दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही लक्ष्य केलं. “राज्यातील परिस्थिती बघा, देवभाऊ म्हणायचं की मेवाभाऊ? पुण्यात मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) जैन बोर्डिंगची जमीन घेतात आणि अजित पवारांचे चिरंजीव कोरेगाव पार्कमध्ये महार वतनाची जमीन घेतात. हीच का विकासाची नवी परिभाषा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘२७ दिवसात झाला व्यवहार, सरकारी यंत्रणा तत्पर!’

दानवे यांच्या मते, अमेडिया कंपनीने २२ एप्रिल २०२५ रोजी आयटी पार्क (IT Park) उभारण्याचा ठराव केला, आणि फक्त ४८ तासांत उद्योग संचालनालयाने या प्रकल्पासाठीची स्टॅम्प ड्युटी माफ केली. फक्त २७ दिवसांत पूर्ण व्यवहार पूर्ण झाला. “एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी १८०० कोटींची जमीन विकत घेते आणि आयटी पार्क उभारण्याची तयारी करते, हे शक्य कसं?” असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

‘पार्थ पवारांनी खुलासा करावा’ – दानवे

दानवे यांनी पार्थ पवारांना थेट आव्हान दिलं की, “ही जमीन खरेदीचा सविस्तर खुलासा करा. कोणता नियम पाळला? कोणत्या सवलती मिळाल्या? आणि सामान्य शेतकऱ्यांना जर एवढ्या सोप्या अटी मिळू शकतात का, हे सांगा.” त्यांनी पुढे म्हटलं, “फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव घेणारे दादा, महार वतनाच्या जमिनी खिशात घालतात. हे महाराष्ट्राने पाहिलं.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now