Ambadas Danve : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक वेगवेगळे निर्णय घेतले जात आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीचा साहसी खेळात समावेश करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतरही नव्या सरकारकडून अनेक नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत.
आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. यातच दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतला आहे. शिधापत्रिका धारकांना केवळ १०० रुपयात काही वस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पॅकेजमध्ये एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेल या चार वस्तूंचा समावेश आहे.
राज्यातील गोरगरिबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यात दारिद्र्यरेषेखालील जनतेला कमी दारात एकावेळी चार वस्तूंचे पॅकेज देणार आहे. मात्र, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
या दिवाळी किटमध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच घाईघाईने अवघ्या तीन दिवसात ५१३ कोटी २४ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुढे ते म्हणाले की, खरेदी आणि ट्रान्सपोर्टेशनची काय गरज आहे? समजा १ कोटी ७० लाख खातेदार आहेत त्यापैकी जर दहा लाख रुपयांनी घेतलंच नाही तर काय करणार?, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच खुल्या बाजारात या चार वस्तूंना पावणे तीनशे रुपयांच्या वर लागत नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.
तसेच हा सगळा खर्च करण्यापेक्षा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. दिवाळी फूड किट योजनेत भ्रष्टाचार होत असल्याने याची चौकशी करण्यात यावी असे ते म्हणाले आहेत. या सगळ्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंनी दसऱ्याला केली खरी सत्तापालट, उद्धव ठाकरेंच्या छातीत बाणासारखा टोचणार ‘हा’ वार
Shivsena : धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? शिंदेगट की ठाकरे गट? उज्वल निकम म्हणाले..
shivsena : अंधेरी पोटनिवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंनी टाकला ‘हा’ खास डाव; वाचा काय आहे M2 समीकरण
Amit Shah : ‘या’ दोन बड्या नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; दसरा मेळाव्यानंतर राजकीय हालचालींना वेग