Shinde Group : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ब्रम्हगव्हाण योजनेशी संबंधित हा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संदीपान भुमरेंच्या जावयाला ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट मिळाले आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट ज्याला मिळाले होते त्याच्याशी करार करून भुमरेंच्या जावयाने नियमबाह्य पद्धतीने कंत्राट लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
स्वप्नील गोरे असे संदीपान भुमरे यांच्या जावयाचे नाव आहे. यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ब्रम्हगव्हाण योजनेचे काँट्रॅक्टर भुमरे साहेबांचे जावई आहेत. त्यांनी रीतसर खरेदीखत रजिस्टर केलेलं आहे. परंतु, अशा पद्धतीने काँट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन होत नसते. तरीसुद्धा भुमरेंच्या जावयाने संबंधित कंत्राटदाराकडून रीतसर औरंगाबादमधील रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन खरेदीखत करून घेतले आहे.
पुढे ते म्हणाले की, ही बाब अतिशय गंभीर आहे. तसेच ब्रम्हगव्हाण योजना ही जनतेच्या हितासाठी आहे की, भुमरेंच्या जावयाला पाळण्यासाठी आहे, हा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही अंबादास दानवे यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील ८९० कोटींच्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला शिंदे-फडणवीस सरकारने मंजुरी दिली होती. या योजनेमुळे पैठण तालूक्यातील ५५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच जवळपास ४२०० एकर जमीन पाण्याखाली येणार आहे.
दरम्यान, या योजनेचे कंत्राटदार हे संदीपान भुमरे यांचे जावई आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. एकीकडे फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे सरकारवर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. त्यात आता हा मुद्दा समोर आल्याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
महत्वाच्या बातम्या
Sanjay Shirsat : मंत्रीपद नाकारल्यानंतर संजय शिरसाटांना पुन्हा धक्का; एकनाथ शिंदेंनी पुन्हा डावललं
Sharad Pawar: …म्हणून वेदांता फाॅक्सकाॅनचा प्रकल्प गुजरातला गेला; शरद पवारांनी सांगीतले खरे कारण
Asad Rauf : क्रिकेटचे पंच असद रऊफ यांचा भयानक शेवट; शेवटच्या दिवसातील अवस्था वाचून येईल डोळ्यात पाणी
Foxconn: …तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती; वेदांताबाबत देसाईंचा मोठा खुलासा