कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सापडला ‘खजिना’, लवकरच थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट होणार

कोल्हापूर | कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात उत्खननात तब्बल ४५७ पुरातन वस्तू सापडल्या आहेत. येथील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननात प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा समोर आल्या आहेत.

यामध्ये कोरीव नक्षीकाम असलेल्या दगडांबरोबर काचेचे कंदील, जर्मन बनावटीची बंदूक, शिवलिंग, घड्याळ, तांब्याची नाणी, विविध देव-देवतांच्या धातूच्या मुर्ती, विरगळांसह विविध धातूची भांडी, मणकर्णिका कुंडाच्या उत्खननात सापडली आहेत.

याबाबत देवस्थान समितीने माहिती दिली आहे की, उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. याशिवाय या कुंडाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. सापडलेल्या सर्व वस्तू भाविकांना पाहण्यासाठी लवकरच खुल्या केल्या जाणार आहेत.

हा कुंड ६० बाय ६० फुटांचा आहे. कुंडाचे काम अंतिम टप्प्यात असून २६ फुटांपर्यंत खोदाई झाली आहे. आणखी १३ फूट याठिकाणी खुदाई करण्यात येणार आहे. खोदाईनंतर कुंडाचे मुळ स्वरूप समोर येणार आहे.

दरम्यान, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, भूकंप अतिवृष्टी असे वातावरणातील नैसर्गिक बदल झेलून हजारो वर्षे टिकून राहिलेल्या अंबाबाई मंदिराचे सेन्सर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. याशिवाय वस्तू व शिल्पांचे जतन संवर्धन आणि नूतनीकरण, सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत करणार, अजित पवारांची घोषणा
शोभन सरकारची भविष्यवाणी खरी ठरणार?; गावात मिळाला पुरलेला खजिना
कोल्हापुरातील शेतकऱ्याला सापडला खजिना; शेतात मिळाले सोन्याने भरलेले मडके

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.