आल्याचे ‘अशा’ पद्धतीने रोज सेवन केल्याने होतात आश्चर्यकारक फायदे, वजन होईल झटक्यात कमी

आल्याचा वापर अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी करत असतो. आल्याचा चहा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देखील खूप फायदेशीर मानला जातो. मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसांमध्ये आल्याचा चहा पिणे उपयुक्त ठरते.

आल्याचे सेवन केल्यामुळे तणाव दूर होण्यास देखील मदत होते. मात्र तुम्हाला माहीत आहे का?, आल्यामुळे आपले वजन देखील कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी आल्याचा वापर कशा प्रकारे करायला पाहिजेल ते आपण जाणून घेऊयात.

वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या घरी आल्याचा रस घेऊ शकता. यामध्ये आपण लिंबू आणि मध देखील समाविष्ट करू शकता. ते तयार करण्यासाठी १ कप पाणी आवश्यक आहे. यानंतर, ब्लेंडरमध्ये आलं, लिंबू, मध मिसळा आणि नंतर ते फिल्टर करुन प्या. आपण हे पेय दिवसातून दोनदा पिऊ शकता.

आपण कॅप्सूलच्या रूपात आल्याची पावडर देखील वापरू शकता. आपण आपल्या अन्नात आल्याची पावडर घालू शकता. ताज्या आल्याच्या तुलनेत शोगाओल नावाच्या संयुगांची मात्रा वाळलेल्या आल्याच्या पावडरमध्ये जास्त आढळते. यामुळे गंभीर आजारांशी लढण्यासही मदत होते.

संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज आल्याचे सेवन करतात, ते जास्त जेवत नाहीत तरीही त्यांचे पोट भरल्याप्रमाणे वाटते. त्यामध्ये असलेले कंपाऊंड जिंजरॉल देखील रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात. संशोधनानुसार, वजन वजन कमी करण्यास आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकते. अशा अनेक वेगवेगळ्या रुपात तूम्ही आल्याचे वापर करून वजन कमी करू शकता.

ताज्या बातम्या

धक्कादायक! पत्नीने भरपंचायतमध्ये पतीला मारली गोळी; कारण वाचून बसेल धक्का

मुलांना सांभाळणारी महिला कर्मचारीच बनली भक्षक; अल्पवयीन मुलांचे करत होती लैंगिक शोषण

“दरेकरांनी अडवली मुख्यमंत्र्यांची गाडी, नार्वेकर म्हणाले, साहेब यांना गाडीत टाका आणि शिवबंधन बांधा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.