वडीलांनी दिलेला ‘तो’ सल्ला मी आजही लक्षात ठेवलाय; खिलाडी अक्षयकुमारने दिली कबुली

अक्षय कुमार बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्याचे स्टारडम सध्या बॉलीवूडमध्ये सर्वाधिक आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्डस् तोडत आहेत. त्यामूळे त्याला सध्या सर्वात जास्त डिमांड आहे.

बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या अक्षय कुमारला त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याला सहजासहजी हे यश मिळाले नाही. हे यश मिळवण्यासाठी अक्षय कुमारने दिवस रात्र बॉलीवूडमध्ये मेहनत केली आहे.

बॉलिवूडमध्ये खिलाडी अक्षय कुमारला ३० वर्ष पुर्ण झाली आहेत. त्याच्याशी वृत्तवाहिनीने संवाद साधला असता तो म्हणाला की, बॉलिवूडमध्ये टिकुण राहणं हा मोठा संघर्ष आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्यास अडचणी येत असतात. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. सर्वांसोबत सलोख्याचे संबंध ठेवणे गरजेचे आहे.

पुढे अक्षय कुमार म्हणतो मला माझ्या वडिलांनी सल्ला दिला आहे की कष्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी सोयीस्कर होऊन जातात. त्यामुळे कष्ट करत राहायचं आणि उद्या काय होईल याची चिंता करायची नाही.

अक्षय कुमारने कॉमेडी, ऍक्शन, रोमँटीक, देश भक्तीवरील अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने कोरोना काळात २५ कोटींची मदत केली होती. त्याचबरोबर मुंबई पोलिसांना दोन कोटींची मदत केली होती. तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना ४५ लाख रूपयांची मदत दिली आहे. देशावर कोणते संकट आले तरी बॉलिवूडमधील अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमार सर्वांच्या पुढे उभा असतो. त्याचे मदतीचे काम अजूनही सूरू आहे.

चित्रपटांमध्ये काम करण्याबरोबरचं अनेक सामाजिक कार्यात खिलाडी अक्षय कुमार सहभागी असल्याने त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यामुळेच तो या क्षेत्रात तब्बल ३० वर्ष टिकून आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आज हॉट आणि ग्लॅमर्स दिसणारी पुजा सावंत लहानपणी दिसत होती खुपच गोंडस; पहा फोटो
५० फुट खोल विहिरीत आढळली रहस्यमय कार, बाहेर काढताच धक्कादायक गोष्टी उघड
रायगड किल्ल्यावर प्री वेडिंग फोटो शूट; शिवप्रेमींकडून घटनेबद्दल संताप व्यक्त…
७/१२ उताऱ्यात झाला ‘हा’ मोठा बदल, मुदतीपूर्वीच अर्ज करा आणि मोठे नुकसान टाळा

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.