Share

अल्लू अर्जुनने व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने पत्नी स्नेहाला दिल्या खास शुभेच्छा, फोटो शेअर करत म्हणाला…

all-arjun-sneha

व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहा रेड्डीला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अभिनेता अल्लू अर्जुनने आपल्या पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेता अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.(allu arjun post photo with  wife on valentine’s day)

पत्नी स्नेहासोबतचा फोटो शेअर करत अभिनेता अल्लू अर्जुनने लिहिले आहे की, “हॅपी व्हॅलेंटाईन्स डे क्युटी.” अभिनेता अल्लू अर्जुनचा या फोटोतील लूक त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील व्यक्तिरेखेसारखाच आहे. या फोटोमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर हलकी दाढी दिसत आहे आणि पांढऱ्या कपड्यांमध्ये त्यांची जोडी खूपच छान दिसत आहे.

या फोटोमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री अल्लू अर्जुन सेल्फी काढत आहे आणि त्याची पत्नी स्नेहा त्याच्या मागे उभी आहे. या फोटोमधील अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा यांच्या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अभिनेता अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. अभिनेता अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांना दोन मुले आहेत.

all-arjun-with-his-wife

आरा आणि अयान अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. अभिनेता अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांची लव्हस्टोरी एका चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांची पहिली भेट अल्लू अर्जुनच्या मित्राच्या लग्नात झाल्याचे सांगितले जाते. अल्लू अर्जुन आणि स्नेहा एकमेकांना पाहताच प्रेमात पडले होते. अल्लू आणि स्नेहा त्यांच्या कॉमन मित्रांमुळे भेटले होते.

‘पुष्पा- द राइझ’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अभिनेता अल्लू अर्जुन हिंदी प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट आता ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला आहे. ‘पुष्पा- द राइझ’ या चित्रपटाला भारतीय प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.

पुष्पा- द राइझ’ या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनने एका लालचंदन तस्कराची भूमिका साकारली आहे. पुष्पा हा व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर लाल चंदनाच्या लाकडाचा तस्करीचा व्यवसाय करतो, असे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
जावयाने दारूच्या नशेत सासरी घातला राडा, मेव्हण्याच्या खोलीत शिरला अन् केले ‘हे’ लाजिरवाणे कृत्य
‘या’ महिलेने इंग्रजांना नाकी नऊ आणले होते, पुरूषांच्या वेशात क्रांतीकारकांना करायची ‘ही’ मदत
कोण होत्या गंगुबाई काठियावाडी? मुंबईच्या रेड लाईट एरियांमधील घराघरात त्यांचेच फोटो का दिसतात?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now